#MumbaiBridgeCollapse – सरकारनं सत्तेतून पायउतार व्हावं – आमदार वारिस पठाण

Update: 2019-03-14 16:41 GMT

केवळ मोबदला देणं, जखमींवर उपचार करणं एवढ करून सरकारला जबाबदारी झटकता येणार नाही. या सर्व घटनेची जबाबदारी घेऊन सरकारनंच राजीनामा द्यावा, अशी मागणी स्थानिक आमदार वारिस पठाण यांनी केलीय.

हजारो कोटी रूपयांचं मुंबई महापालिकेचं बजेट आहे. या पुलाच्या दुरूस्तीकडे महापालिकेनं आणि सरकारनं कमालीचं दुर्लक्ष केलं आहे. त्यामुळं सरकारनं सत्तेतून खाली आलं पाहिजे, अशी मागणीच आमदार पठाण यांनी केलीय. जर स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये दुरूस्ती सुचवली होती तर त्यावेळीच योग्य ती खबरदारी घेऊन दुरूस्ती का करण्यात आली नाही, असा सवालही आमदार पठाण यांनी उपस्थित केला. स्मारकांसाठी सरकारडे हजारो कोटी रूपये आहेत. मात्र, पुलांच्या दुरूस्तीसाठी सरकारकडे पैसे नाहीत, लोकांच्या सुरक्षेचं काय असा प्रश्नही आमदार पठाण यांनी उपस्थित केला.

Full View

Similar News