मोदींची मुलाखत फिक्स होती - जितेंद्र आव्हाड

Update: 2019-01-02 06:44 GMT

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एएनआय़ या वृत्तसंस्थेला पंतप्रधान झाल्यानंतर पहिल्यादांच मुलाखत दिली. आता या मुलाखतीनंतर विरोधी पक्षांनी मोदींच्या या मुलाखतींवरच प्रश्न चिन्ह उपस्थित केलं आहे. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या मुलाखतींवर काही प्रश्न उपस्थित केले असून ही मुलाखत फिक्स असल्याचा आरोप केला आहे.

मी आजवर क्रिकेट सामने फिक्स असल्याचे ऐकले होते, पण हल्ली मुलाखतीही फिक्स असतात, अशा कठोर शब्दात आव्हाड यांनी या मुलाखतीवर आपल्या फेसबुक पेजवर एक व्हिडीओ अपलोढ करत टीका केली आहे.

‘गेल्या साडेचार वर्षात एकही मुलाखत न देता ऐन निवडणुकीच्या तोंडावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिलेली ‘फिक्स’ मुलाखत मोदींच्या मानसिक पराभवाचे द्योतक आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही, देशातील मुख्य प्रश्न व समस्यांचा यथायोग्य उहापोह न करू शकणारी ही आदर्श मुलाखत होती. असं म्हणत आव्हाड थेट मोदींवर निशाणा साधला आहे.

काय म्हटलंय आव्हाड यांनी...पहा हा व्हिडिओ -

Full View

‘लहानपणी एक मुलगा बॅट- बॉल घेऊन यायचा आणि आम्हाला क्रिकेट खेळायला लावायचा. त्याला आवडेल त्याला बॉलींग करायला लावायचा. बॅटींग मात्र तो स्वतःच करायचा. बॉल जोरात टाकला तरी ओरडायचा’. तसेच फेसबुक पेजवरील व्हिडीओमध्ये मोदी सर्वधर्म समभाव म्हणतात, पण गुजरात दंगलीतील मुस्लिमांच्या हत्येबाबत ते काहीच बोलत नाही. राफेल कराराबाबतही त्यांनी भाष्य करणे टाळले’ असं म्हणत आव्हाड यांनी मोदी यांच्या मुलाखतीवर प्रश्न चिन्ह उपस्थित केलं आहे.

पंतप्रधान मोदिंची एएनआय़सोबतची मुलाखत , पहा हा व्हिडिओ -

Full View

 

Similar News