‘पीएम नरेंद्र मोदी’ विरूद्ध मनसेचं खळ्ळ-खट्ट्याक

Update: 2019-03-23 08:50 GMT

सध्या लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झालीय. या रणधुमाळीतच पीएम नरेंद्र मोदी हा चित्रपट प्रदर्शित होतोय. या चित्रपटाच्या प्रदर्शनावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आक्षेप घेतलाय.

येत्या ५ एप्रिल ला पीएम नरेंद्र मोदी हा विवेक ओबेरॉयची प्रमुख भूमिका असलेला चित्रपट प्रदर्शित होतोय. ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळातच हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. सध्या आचारसंहिता लागू आहे. अशा परिस्थितीत सर्वांनी आचारसंहितेचं पालन करणं अपेक्षित आहे. मात्र, जर सत्ताधारी पक्षच आचारसंहितेचं पालन करणार नसेल तर हा गैरप्रकार रोखण्यासाठी मनसेला खळ्ळ – खट्ट्याक करावंच लागेल, अशा इशारा मनसेच्या नेत्या शालिती ठाकरे यांनी दिलाय.

पीएम नरेंद्र मोदी चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी याआधी काँग्रेस आणि डीएमके या दोन पक्षांनी केलेली आहे. त्यात आता मनसेनंही ही मागणी केल्यानं चित्रपट प्रदर्शनाआधीच वादात सापडण्याची शक्यता निर्माण झालीय.

 

 

Similar News