मनसेने अहमदनगर येथे केले 'या' मागणीसाठी आंदोलन

औरंगाबादच्या नामंतराच्या मागणी नंतर आणखी एक शहराच्या नामंतराचा मुद्दा कायम चर्चेत राहिला तो म्हणजे अहमदनगर शहराचा...अहमदनगर शहराचे 'अंबिकानगर' असे नामकरण करावे अशी गेल्या अनेक दिवसांपासूनची मागणी आहे.त्यातच काल शहराच्या 531व्या स्थापनादिनी मनविसेनेच्या कार्यकर्त्यांनी शहराच्या प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या कायनेटिक चौकात शहराचे नामकरण 'अंबिकानगर' करावे, या मागणीचे फलक लावून घोषणाबाजी केली. या छुप्या पद्धतीने केलेल्या आंदोलनामुळे एकच खळबळ उडाली, अहमदनगर वरून सुनील भोंगळ यांचा रिपोर्ट..

Update: 2021-05-29 06:50 GMT

राज्यातील औरंगाबादसह अनेक शहरांच्या नामांतराची मागणी होत आहे. त्यासंबंधीचे फलक लावून अनेक ठिकाणी आंदोलने झाली आहेत. मध्यंतरी औरंगाबाद शहराच्या 'संभाजीनगर' नामांतर प्रश्न चांगलाच गाजला.. त्याच धर्तीवर अहमदनगर शहरामधील हिंदुत्ववादी संघटनांनी मागील अनेक वर्षांपासून अहमदनगर चे नामांतर 'अंबिकानगर' करावे, अशी मागणी लावून धरली आहे. शिवसेनेने ही मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केलेली आहे

तुळजापुरच्या श्री भवानी मातेचे माहेर म्हणून नगर जवळच असलेले बुऱ्हाणनगरची ओळख आहे. दसऱ्याला तुळजापुरला तुळजाभवानी मातेची पालखी-पलंग बुऱ्हाणनगर येथूनच नेण्याचा मान आहे. या पार्श्वभूमीवर अहमदनगर शहराचे नाव 'अंबिकानगर' करावे, अशी काहींची मागणी आहे. दुसरीकडे शहर हे मोजक्या स्थापित शहरांपैकी एक असून 28 मे 1490 ला अहमदशहा बहिरी यांनी या शहराची स्थापना केली, असा इतिहास असून त्या नावावरून शहराचे नाव अहमदनगर आहे.मात्र मनविसेच्या या आंदोलनाच्या टाईमिंगबाबत काहीशी चर्चा होतांना पाहायला मिळत आहे.

Tags:    

Similar News