वाधवान प्रकरणावर अशोक चव्हाण यांची पहिली प्रतिक्रिया... पाहा काय म्हणाले

Update: 2020-04-11 15:14 GMT

महाराष्ट्र शासनाची पूर्ण यंत्रणा कोरोना व्हायरसवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यातच महाराष्ट्रात कोरोना व्हायरस ची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

प्रत्येक जिल्ह्याचे पालकमंत्री आपापल्या जिल्ह्यातील परिस्थिती वर नियंत्रण ठेवत आहेत. नांदेड जिल्हयात सतर्कता म्हणून राज्याचे बांधकाम मंत्री आणि नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण सध्या नांदेड मध्येच आहेत. मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी धनंजय साळुंके यांनी अशोक चव्हाण यांच्याकडून राज्यसरकार करत असलेल्या उपाययोजना आणि वाधवान कुटुंबियांना महाबळेश्वर ला जाण्यासाठी विशेष दिलेली परवानगी यासंदर्भात बातचित केली.

यावेळी त्यांनी कोरोनाशी लढण्यासाठी लोकांचं सहकार्य जो पर्यन्त मिळत नाही, तो पर्यन्त कोरोनाचा धोका टळणार नाही. असं म्हणत देशातील लॉकडाउन पुढे वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. असं त्यांनी मॅक्समहाराष्ट्र शी बोलताना सांगितलं.

तसंच वाधवान कुटुंबाबत बोलताना वाधवान कुटुंबाचा एक विषय समोर आलेला आहे. या प्रकरणाची चौकशी सुरु झालेली आहे. आजच्या लेवल ला अधिकाऱ्यांनी कशामुळं केलंय? काय केलंय? हे समोर येइलच. सध्या त्या अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलेलं आहे. त्यामुळं जे काय कारवाई व्हायची आहे ती होइलच. असं आश्वासन दिलं पाहा काय म्हटलंय अशोक चव्हाण यांनी...

Full View

Similar News