Maxmaharashtra Impact : तीव्र कुपोषणग्रस्त चिमुकलीला मिळाली मदत

Update: 2019-08-20 16:27 GMT

मोखाड्यातील तीव्र कुपोषणग्रस्त असलेली अडीच वर्षांची चिमुकली पूनम मलेश चौधरी. तिच्या वडीलांच्या हाताला काम नसल्यानं तिच्या कुटुंबाला दुसऱ्याच्या घरी राहुन आयुष्य काढावं लागतंय. सरकार दफ्तरी कोणतीच नोंद नसल्यानं कोणत्याही योजनेचा लाभ नाही. कुपोषणाची सुरुवात, द्रारिद्र्याचं भयाण वास्तव आणि प्रशासन यंत्रणेचं दुर्लक्ष मॅक्स महाराष्ट्रने आपल्या विशेष रिपोर्ट मध्ये उघडकीस आणल्यानंतर प्रशासन खडबडून जागं झालं आहे.

‘त्या’ चिमुकलीसोबत प्रशासनालाही कुषोषणाची लागण

मोखाड्यातील तहसीलदार विजय शेट्ये यांनी या वृत्ताची तात्काळ दखल घेत, पुनमच्या कुटूंबियांची घटनास्थळी भेट घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी तहसील कार्यालयाकडून तिच्या कुटूंबाला धान्य स्वरूपात मदत करण्यात आली आहे. तसेच दोन दिवसात चौधरी कुटूंबाला रेशनकार्ड देण्यात येणार असून सर्वोतोपरी मदत त्या कुटूंबाला करण्यात येणार असल्याचं आश्वासन त्यांनी मॅक्समहाराष्ट्रशी बोलताना दिले आहे. तसेच पुनम आणि तिच्या आई-आजीला श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जव्हार येथील छावणीत पुढील उपचारासाठी नेण्यात आलं आहे. नेमकं काय म्हटले तहसीलदार विजय शेट्ये पाहा हा व्हिडीओ...

Full View

Similar News