यवतमाळमधील ‘त्या’ काश्मीरी विद्यार्थ्यांसोबत मँक्समहाराष्ट्रचा संवाद...

Update: 2019-02-22 12:30 GMT

पुलवामा हल्ल्यातील घटनेनंतर देशभरात संतापाची उसळलेली लाट काही केल्या शांत होत नाहीये. बुधवारी रात्री यवतमाळच्या वाघापूर परिसरातील वैभवनगरमध्ये जम्मू-काश्मीरमधून शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली. या विद्यार्थ्यांशी मॅक्समहाराष्ट्रने बातचित केली. असता हे विद्यार्थी खूप घाबरलेले असून त्य़ांना शिकण्याची इच्छा आहे. मात्र, काही लोकांनी त्यांना जीवंत मारण्याची धमकी दिली असल्यानं भीती वाटत असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं.

यावेळी मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना या काश्मीरी युवकांनी ‘आम्ही फक्त इथं शिकण्यासाठी आलो असल्याचं मत व्य़क्त केलं. आम्हाला फक्त सुरक्षा हवी आहे. मारहाण झाल्यामुळे मित्र देखील या भीतीने निघून गेले’. आम्हाला इथं खूप भीती वाटते असं मत या विद्यार्थ्यानी मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना व्यक्त केलं.

Courtesy : Social Media

त्यातील एका मुलाने सांगितलं की,

हमारे घरवालों का फोन आया उनको हमने बताया की हम महाराष्ट्र में सेफ़ है, और शाम कों हमें शिवसेना के लोगों ने मारा। हम भारत से है इसिलिए यहाँ पढ़ने आए है।

सकाळी आमच्या घराच्यांचा कॉल आला तेव्हा घरच्यांना आम्ही सुखरुप असल्याचे सांगितलं असल्याचं तरुण सांगत होता. मात्र, रात्री असं झालं असं रडत रडत तो विद्यार्थ्यी सांगत होता. आम्ही भारतीय आहोत म्हणून इथं शिकायला आलो असं देखील या विद्यार्थ्याने स्पष्ट केलं.

Full View


आम्हाला जर अशा प्रकारे त्रास दिला गेला तर

आम्ही महाराष्ट्र सोडून जाऊ असं मत या काश्मीरी तरुणांनी मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना व्यक्त केलं. तर एका विद्यार्थ्याने सांगितलं की परत आमच्या भागातून कोणीही महाराष्ट्रात शिकायला येणार नाही. आमचे सिनियर इथं होते म्हणून आम्ही या ठिकाणी शिकायला आलो. मात्र, आता ते सर्व सिनिअर या ठिकाणावरुन निघून गेले आता आम्ही कसं राहणार? आम्हाला हा परिसर नवीन आहे. त्यामुळे खूप भीती वाटते.

मॅक्समहाराष्ट्राच्या फेसबुक पेजवर हे लाईव्ह सुरु असताना काही प्रेक्षकांनी काश्मीरी तरुणांना सपोर्ट देत हा छत्रपचती शिवरायांचा महाराष्ट्र असल्याचं सांगत आम्ही तुमच्या बरोबर आहोत. असं म्हणत या विद्यार्थ्यांना धीर दिला. यावेळी या विद्यार्थ्य़ांनी सर्व महाराष्ट्राचे तसंच मॅक्स महाराष्ट्राचे आभार मानत जय हिंद म्हणत लोकांशी संवाद साधला.

दरम्यान ही मारहाण युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी केल्याची चर्चाही आहे. पोलिसांनी युवासेनेच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली असून मारहाण झालेल्या काश्मीरी विद्यार्थ्यांनी या घटनेविरोधात लोहारा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. युवासेनेच्या 10-12 कार्यकर्त्यांनी मिळून 3-4 काश्मीरी विद्यार्थ्यांना मारहाण केली आहे. मारहाण करतांना या विद्यार्थ्यांना अश्लील भाषेत शिवीगाळही करून त्यांना काश्मीरमध्ये परत जाण्याचा इशाराही युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी दिल्याचं व्हिडिओमध्ये पाहायला मिळतंय.

Full View

Similar News