बेरोजगारांचा आक्रोश लॉंग मार्च

Update: 2019-03-07 17:27 GMT

तरुणांना दर वर्षी दोन कोटी नोकऱ्या देण्याचं आश्वासन देऊन मोदी हे पंतप्रधान पदावर विराजमान झाले. मात्र, पाच वर्षे उलटूनही तरुणांना ना रोजगार ना नोकरी यामुळं देशभरात बेरोजगारीची संख्या कमालीची वाढली. तरुणांमध्ये सरकार विरुद्ध आक्रोश वाढला. नोकऱ्या द्या याच मुद्द्यावर पंतप्रधान मोदी यांना आठवण करून देण्यासाठी तरुण बेरोजगारांचा पायी चालत लॉंग मार्च काढण्यात आला. भुसावळ ते जळगाव असा हा बेरोजगार तरुणांनाचा आक्रोश मोर्चाला सुरूवात झाली आहे. उद्या शेकडो तरुण जळगाव येथ पोहचत आहे.

"नरेंद्र देवेंद्र हे बेरोजगांचे केंद्र" अश्या आशयाचे फलक बेरोजगार तरुणांनी हाती घेऊन लक्ष वेधलं आहे. या मोर्चात ऑल इंडिया रेल्वे अप्रेटीस प्रशिक्षणार्थी विद्यार्थी, तसच ऑर्डनन्स फॅक्टरी, औष्णिक प्रकल्प यात कायमस्वरुपी नोकरी मिळावी यासाठी मोठ्या प्रमाणावर तरुण या मोर्चात सहभागी झालाय.

नुकत्याच आलेल्या एका अहवालाच्या आकडेवारीनुसार 7:04 टक्के बेरोजगारी वाढल्याचा धक्कादायक अहवाल आलाय. सेंटर फॉर मॉनेटरिंग इंडियन इकॉनॉमी या संस्थेचा हा अहवाल आहे.

नेशनल स्लॅम सर्वे ऑफिस

(एन एस एस ओ) च्या सर्वेनुसार 2014 साली बेरोजगारांची संख्या 2:2 टक्के होती तो रेशो प्रचंड वाढून 2019 मध्ये सात टक्क्यांपर्यंत पोहचला आहे. या अहवालानुसार मागील वर्षात म्हणजे डिसेंबर 2017 ते डिसेंबर 2018 या कालावधीत एक कोटीहून अधिक लोकांना आपला रोजगार गमवावा लागलाय.

शेकडो तरुण पदव्या, डिग्री घेऊन बाहेर पडत आहे. मात्र, रोजगाराच्या संधीच नाहीत. सरकारी नोकऱ्यांबाबत तर तोकड्या जागांवर हजारो बेरोजगार तरुण अर्ज करताहेत. मात्र, नोकऱ्या मिळत नाहीत. जे मोदी सरकार दोन कोटी तरुणांना दरवर्षी रोजगार देण्याच्या आश्वासनावर सत्तेत बसलं त्यांना जाब विचारण्यासाठी तरुण बेरोजगार रस्त्यावर उतरला आहे.

Similar News