गरीब व्यावसायिकांनी कुठं जायचं…?

Update: 2020-09-24 05:15 GMT

कोरोनामुळे अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडल्यामुळे एप्रिल ते जुनच्या पहिल्या तिमाहीत देशाची अर्थव्यवस्था २४ टक्क्‍यांनी घसरली आहे. त्यामध्ये आणखी वाढ होऊन ती पुढे किमान १० ते १५ टक्क्‍यांनी कमी होण्याची शक्‍यता आहे. त्याचा थेट परिणाम नोकरी, उद्योग, व्यवसायावर होणार आहे. त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था रसातळाला गेल्याचं दिसून येत आहे. मंदीचा सर्वात मोठा फटका हा लहान लहान व्यावसायिकांना बसला आहे. काहींनी तर आपला व्यवसाय हा लॉकडाऊन च्या काळात बंद केला आहे.

 

हळूहळू स्थिती ही पूर्वपदावर येत आहे आणि राज्यसरकारने अनलॉक ची पद्धत सुद्धा जाहीर केली आहे. त्यात लोकांनी घराबाहेर पडताना कोणती काळजी घ्यावी? व्यवसाय करताना व्यावसायिकांनी कोणती काळजी घ्यावी? या करता राज्यसरकार अनलॉक जाहीर करत आहे. पण खरंच या अनलॉकचा फायदा हा छोट्या व्यावसायिकांना होतो का? हे पाहण्यासाठी मॅक्समराष्ट्र ने लॉकडाउन यात्रा काढली आहे.

आम्ही या संदर्भात चर्मकार सुरेश कदम यांच्याशी बातचीत केली. असता, मॅक्समराष्ट्र ला सांगितलं, या लॉकडाऊन मुळे आमच्या व्यवसायाची रोलिंग च तुटलं आहे. घर चालवायचं कसं? हाच खर तर प्रश्न आमच्या समोर निर्माण झाला आहे. हे अनलॉक तर होत आहे. पण याचा फायदा तसा काहीसा खास झाला नाही. त्यात रेल्वे बंद आहेत. त्यामुळे प्रवासाची गैरसोय झाली आहे. माझ्या मताने लॉकडाऊन उठवून ही स्थिती पूर्वपदावर आणावी. जेणेकरून गरीब माणूस जगला पाहिजे.

असं मत चर्मकार सुरेश कदम यांनी मॅक्समहाराष्ट्राशी बोलताना व्यक्त केलं आहे. अशीच काहीशी परिस्थिती मुंबईतील चर्मकारांची असल्याचं दिसून येत आहे.

Full View

Similar News