कामाठीपुरातील वेश्या म्हणतात ‘इकडे या पैसे दया, पाहिजे ते करा पण बलात्कार थांबवा...!’

Update: 2019-12-13 04:08 GMT

सध्य़ा आपण सकाळी सकाळी वृत्तपत्र पाहीली तर, महिला अत्याचारांच्या घटनेने वृत्तपत्रांची मथळे आपल्याला पाहायला मिळतात. सर्वोच्च न्यायालयाने संरक्षण दिलेल्या पीडितेला जाळून मारलं जातं. या अत्याचाराच्या घटनेनं देशातील जनता हादरली आहे.

मुलींना घराबाहेर पाठवताना पालकांच्या मनात मोठी भीती निर्माण झाली आहेत्यामूळे महिला सुरक्षा हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. लहान मुलींवर अत्याचार होत आहेत. दिव्यांग महिलांना अत्याचार करुन ठेचून मारलं जात आहे.

असिफा प्रकरण, कोपर्ङी, दिल्ली निर्भया प्रकरण, शक्ती मिल, उन्नाव, हैद्राबाद, नागपूर अशा कित्येक प्रकरणांची नाव जोडली तर यादी वाढतच जाईल. या प्रकरणांनी देश हादरुन गेला आहे. हैदराबाद बलात्कार प्रकरणाचे पङसाद महाराष्ट्रात ही जाणवले अनेक निषेध मोर्चे निघाले.

अनेक तरुणी रस्त्यावर आल्या. आरोपींना 'फाशीची शिक्षा झालीच पाहिजे' ही मागणी सुरु असताना या प्रकरणातील आरोपींचा इनकाउंन्टर करण्यात आलं. तर तिकडं, उन्नाव प्रकरणातील पिडीतेला जाळुन मारुन टाकण्यात आलं. महिलांवरील अत्याचारा विरोधात लोकांच्या भावना आजही तीव्र आहेत. एन्काउंटर करुन समस्या सुटणार आहेत का?

देशात घडणाऱ्या अत्याचारबाबत वेश्या व्यवसायातील महिलांच्या प्रतिक्रिया आम्ही जाणुन घेतल्या.

मुंबईतील कामठीपूरा हा रेड लाईट एरिया म्हणून ओळखला जातो. कामाठीपुरा भागात आजच्या घडीला शरीरविक्री करणा-या सुमारे ३ हजार ७०० महिला असतील. त्यातील सुमारे अठराशे महिला कामाठीपु-यातील चौदाव्या गल्लीत तसेच शुकलाजी इस्टेट या भागात खोल्यांमध्ये राहातात. तर आता काही महिला उपनगरात वास्तव्याला आहेत.

काळ रात्र झाल्यानंतर या भागात व्यवसायासाठी येतात. २००० पूर्वी या भागात सुमारे ६६० कुंटणखाने होते. पण आजच्या घडीला ही संख्या दोनशेच्या पुढे मागे असल्याचं सांगण्यात येतं. छोट्या खोल्यांमध्ये या महिला अतिशय दाटीवाटीने राहतात. शंभर रूपया पासून पुढे किंमत ठरत हा व्यवसाय केला जातो.

देह विक्री करणाऱ्या महिलांनी यावर संत्पत प्रतिक्रिया दिल्या, मात्र, या प्रतिक्रिया विचार करायला लावणाऱ्या आहेत.

'अत्याचारच वाढलेल प्रमाण चांगल नाही. रेङ लाईट एरियात पैसे देऊन वासना भागते, त्यामुळे असे कृत्य टाळले पाहिजे, लहान-मोठया सगळ्या महिला सुरक्षित राहण्यासाठी सरकारने कठोर कायदे केलं पाहिजे. महिलांना सुरक्षित केल पाहिजे. वेश्या महिलांची बाजू सुद्धा समजून घेतली पाहिजे.'

वेगळ्या नजरेनं पाहिल्या जाणाऱ्या हा गल्ल्यामधून माणुसकीचा आवाज आला. परिस्थितीने मजबूर होत देह विक्री करणाऱ्या महिला सुद्धा समाजातील घङणाऱ्या या घटनाकडे उघड्या ङोळयाने पाहतात याची जाणीव मनात कायमच घर करुन गेली. मात्र, जो स्वत:ला सुसंस्कृत म्हणून घेतो. त्या समाजात याची जाणीव कधी होणार असा प्रश्न वारंवार समोर आल्याशिवाय राहत नाही.

Full View

Similar News