सफाई कर्मचारी महादेव जाधव यांची सुरेल मोहीम

Update: 2019-11-18 13:33 GMT

सफाई कर्मचारी महादेव जाधव यांच्यासोबत ‘मॅक्समहाराष्ट्र’ची सुरेल मोहीम

पुण्याच्या पर्वती परिसरात स्वच्छता सेवक असलेले महादेव जाधव हे आपल्या सुरेल गाण्यातून कचरा समस्येविषयी लोकांमध्ये जनजागृती करत आहेत. पुणेकरही(Pune) तेवढयाच आत्मीयतेने ते ऐकून त्यांना दादही देत आहेत. जाधव यांचा हा गाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

पुणेकरांना आपल्या गाण्यातून कचरा समस्येचा संदेश देणारे स्वच्छता कर्मचारी महादेव जाधव पुणेकरांना चांगलेच भावले आहेत. महादेव जाधव यांनी ‘मॅक्समहाराष्ट्र’चे प्रतिनिधी तुषार झरेकर यांच्यासोबत मनमोकळ्या गप्पा मारल्या आणि अधिकाअधिक लोकांपर्यंत त्यांचा कचरा समस्येविषयी संदेश पोहचावा ही इच्छा व्यक्त केली. पाहा व्हिडीओ...

Full View

Similar News