Lockdown मुळे सोन्याचा व्यापारी झाला कांदा विक्रेता...

Update: 2020-05-25 03:23 GMT

कोरोना च्या महामारीनंतर जग बदलेल असा अंदाज तज्ञ आत्ताच व्यक्त करत आहेत. मात्र, त्या अगोदरच काही बदल पाहायला मिळत आहेत. यामध्ये सर्वात मोठा बदल म्हणजे अनेक व्यवसायीकांनी आपल्या व्यवसायात बदल केले आहेत. मुंबईत हातगाडी वर वडापाव चा धंदा करणाऱ्या अनेक लोकांनी आता फळाचा, भाजीपाल्याचा व्यवसाय़ सुरु केल्याचं दिसून येत आहे. मात्र, ग्रामीण भागात एका सोने विक्रेत्याने चक्क एका कांदा विक्रिचं दुकान सुरु केलं आहे.

सध्याचा काळ हा लग्न सराईचा काळ आहे. मात्र, लॉकडाऊन मुळं सोन्या चांदीचा व्यवसाय ठप्प पडला आहे. अशाच सराफ व्यापाऱ्यांचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे. आधीच सोने चांदीची खरेदी विक्री मंदावली असताना हे कोरोनाचे संकट अधिक गडद झाले. ज्वेलर्स व्यावसायिक मोठ्या अडचणीत सापडले. अखेर काहीतरी उदरनिर्वाह चालावा यासाठी रायगड जिल्ह्यातील पाली येथील ज्वेलर्स दुकानदार रवी ओसवाल यांनी आपल्या ज्वेलर्स दुकानात चक्क कांदे भरून ठेवले असून ते होलसेल दरात विकत आहेत. पाहा मॅक्समहाराष्ट्र चा स्पेशल रिपोर्ट

Full View

Similar News