शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईच्या वाटपात टक्केवारीचा खोडा

Update: 2021-11-02 14:01 GMT

गेल्या तीन वर्षांपासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील शेतकरी संकटात सापडला आहे, त्यातच सरकारने जाहीर केलेली मदत तुटपुंजी आहे, मात्र तरीही या मदतीतून स्वता:ला सावरण्याची अपेक्षा करत असतानाच सरकराने आता शेतकऱ्यांच्या मदत वाटपातही टक्केवारीचा खोडा घातला आहे. त्यामुळे घोषणा करण्यात आलेल्या मदतीतील ७५ टक्केच रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आहे.





 


 


नेहमीच दुष्काळाच्या दृष्टचक्रात अडकणाऱ्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांना यावर्षीही अतिवृष्टीचा सामना करावा लागला. एकट्या मराठवाड्यात ४७ लाख शेतकऱ्यांचे ३६ लाख ६२ हजार ७८२ हेक्टरवरील पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. सलग तीन वर्षांपासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी पूर्णपणे खचला असून, आता त्याला सरकारच्या भरीव मदतीची अपेक्षा होती. पण नेहमीप्रमाणे सरकराने यावेळीही तुटपुंजी मदत जाहीर केली. त्यामुळे किमान या मदतीने शेतकऱ्यांची दिवाळी गोड होईल अशी अपेक्षा असताना सरकराने आता शेतकऱ्यांच्या मदत वाटपातही टक्केवारीचा खोडा घातला असून, शेतकऱ्यांना आता ७५ टक्केच मदत मिळणार आहे.




 


राज्य शासनाने जाहीर केलेल्या दहा हजार कोटींच्या पॅकेजमधून मराठवाड्याला ३ हजार ७६२ कोटी रुपयांची मदत मिळणार होती. मात्र, आता ती ७५ टक्क्यानुसार २ हजार ८२१ रुपये मिळणार आहे. त्यामुळे ७५ टक्क्यांच्या तुलनेत पाहिले तर, जिरायती क्षेत्रासाठी १० हजार जाहीर करण्यात आल्यापैकी आता ७ हजार ५०० रुपये मिळणार आहे. तर बागायतीसाठी १५ हजारांच्या तुलनेत ११ हजार २५० रुपये मिळतीत तसेच, फळपिकांसाठी २५ हजाराच्या मदती पैकी आता १८ हजार ७५० रुपयेच मिळणार आहे.

मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या छाताडावर बसलेलं संकट काही नवीन नाही, पण अशा संकटात बळीराजाला भक्कम आधाराची आवश्यकता असते, मग सरकार कोणतेही असो आणि हीच अपेक्षा महाविकास आघाडीच्या सरकारकडूनही होती, पण भक्कम मदत सोडा दिलेल्या मदतीत सुद्धा टक्केनिहाय यादीचा खोडा घालून सरकारने पुन्हा एकदा शेतकऱ्यांची थटा केली आहे.

विरोधकांची सरकारवर टीका

राज्य सरकारकडून देण्यात येत असलेल्या मदतीवरून विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला आहे.भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांनी यावर बोलतांना म्हंटले आहे की, " आघाडी सरकारने पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसला. ५ एक्कर मर्यादेसह एक्करी ४००० रुपयांची मदत आणि त्यापैकी दिवाळीपूर्वी ७५% (एक्करी ३००० रु.) मदत खात्यावर जमा करण्याची घोषणा करणाऱ्या सरकारने प्रत्यक्षात मात्र एक्करी फक्त १ हजार ८७ रुपये म्हणजे ४ एक्कर शेत असलेल्या शेतकऱ्याच्या खात्यावर ४ हजार ३५० रुपये इतकी तुटपुंजी मदत जमा केली आहे. गोड बोलून सरकारने शेतकऱ्यांची उघड उघड फसवणूक केली असून शेतकरीविरोधी सरकारचा धिक्कार, असं पवार म्हणाले आहे



.Full View

Tags:    

Similar News