Cyclone Fani : फानी वादळ आता पश्चिम बंगालच्या दिशेनं सरकरलं, कोलकातामध्ये मुसळधार पाऊस

Update: 2019-05-03 05:25 GMT

फानी चक्रीवादळ ओडिशाच्या किनाऱ्यावर धडकलं आहे. हे वादळ आता पश्चिम बंगालच्या दिशेनं पुढे सरकलं आहे. फानी चक्रीवादळाचा ओडिशा व्यतिरिक्त आंध्र प्रदेश, तामिळनाडू, पश्चिम बंगालला देखील फटका बसण्याची शक्यता आहे. हवामान खात्यानं वर्तवल्यानुसार फानी चक्रीवादळ सकाळी ९: ३० वाजता फानी चक्रीवादळ (Cyclone Fani) जगन्नाथ पुरीच्या जवळ दाखल झाले आहे. दरम्यान हे वादळ आता पश्चिम बंगालच्या दिशेनं पुढे सरकलं आहे. फानी चक्रीवादळाचा ओडिशा व्यतिरिक्त आंध्र प्रदेश, तामिळनाडू, पश्चिम बंगालला देखील फटका बसण्याची शक्यता आहे.

https://youtu.be/aQTyKY36PgE

ओडिशाच्या किनारपट्टीवर फानी चक्रीवादळामुळे पावसाला सुरुवात झाली असून जोराने वारे वाहत आहेत. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून ११ लाख लोकांना सुरक्षित स्थानावर नेण्यात आले आहे. हवामान खात्यानं वर्तवल्यानुसार फानी चक्रीवादळ जगन्नाथ पुरीच्या जवळ दाखल झाले आहे. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी लोकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.

त्यामुळे दक्षिण भारतातील किनारपट्टीवरील राज्यात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. केरळ आणि ओडिशा या राज्याला फानी वादळाचा मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसंच या वादळाचा फटका आंध्र प्रदेश, तामिळनाड़ू आणि पश्चिम बंगालला देखील बसण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. दरम्यान हवामान खात्याच्या इशाऱ्यानंतर फानी चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी भारतातील लष्कर आणि नौदल सज्ज झाले आहे. भारताच्या तीनही संरक्षण दलांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ओडिशाच्या किनारपट्टीवर फानी धडकल्यास त्याचा वेग २०० किमी प्रतितास वेगाने वारे वाहू शकतात. यामुळे आजूबाजूच्या परिसराला नुकसान पोहोचू शकतं. किनारपट्टीला धडकल्यानंतर वादळाची तीव्रता कमी होऊ शकते.

Similar News