Fact Check : संसदेवर हल्ला झााला तेव्हा कुठे होते सोनिया-राहुल गांधी?

Update: 2019-05-05 05:01 GMT

संसदेवर हल्ला झाला तेव्हा राहूल गांधी आणि सोनिया गांधी संसदेमध्ये नव्हते. कुछ समझे, अशा पद्धतीच्या काही पोस्ट सध्या व्हायरल आहेत. ज्या वेळेला आम्ही जेव्हा फॅक्ट चेक केलं तेव्हा असं आढळून आलं की, सोनिया गांधी या संसदेत होत्या. जेव्हा हल्ला झाला तेव्हा अटलबिहारी वाजपेयी हे पंतप्रधान आणि सोनिया गांधी ह्या विरोधी पक्ष नेत्या होत्या. सुरक्षा रक्षकांनी त्यांना संसदेच्या प्रांगणातून बाहेर काढलं होतं.

त्यावेळेला 100 खासदार संसदेमध्ये उपस्थित होते. या हल्ल्याच्या वेळेला 12 लोकांचा मृत्यू झाला होता आणि 22 जण जखमी झाले होते. त्याचबरोबर तत्कालीन विरोधी पक्ष नेत्या सोनिया गांधींबरोबरच इतर सर्व पक्षांनी सरकारला पाठींबा दिला होता.

 

हा हल्ला झाल्यानंतर तातडीने अटलबिहारी वाजपेयी यांनी देशाला उद्देशून संबोधन केलं होतं. त्यामध्ये संपुर्ण देश एक संघ आहे. हा हल्ला केवळ एका इमारतीवर नसून हा संपूर्ण राष्ट्र वर केलेला हल्ला जाहीर केलं होतं. त्यावेळी संपुर्ण विरोधी पक्ष सरकार सोबत ठामपणे उभा होता. हे आमच्या फॅक्ट चेकमध्ये समोर आले. विशेष बाब म्हणजे हा हल्ला जेव्हा झाला तेव्हा राहुल गांधी खासदार नव्हते. त्यामुळं ते संसदेमध्ये जाणं किवा न जाणं याचा प्र्श्नच उपस्थित होत नाही.

सोनिया गांधी संसदेतच होत्या का? बीबीसी ने दिले वृत्त

बीबीसी यूके

Similar News