Fact Check : खरच ऑनलाईन मतदान करता येणार का?

Update: 2019-02-22 03:20 GMT

सध्या निवडणुकांचा हंगाम सुरु झाला आहे. त्यामुळे आरोप प्रत्यारोपांबरोबरच सोशल मीडियावरील खऱ्या खोट्या बातम्यांमुळे नागरिकांच्या मनात संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे. सध्या सोशल मीडियावर अनेक बातम्या व्हायरल होत असतात अशा वेळी त्य़ा बातम्या खऱ्या की खोट्या हा प्रश्न उभा राहतो. सध्या सोशल मीडियावर ऑनलाईन मतदाना संदर्भात एक संदेश व्हायरल होत आहे.

काय आहे संदेशात?

भारतीय निवडणुक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटचा दाखला देत ज्या व्यक्तीकडे पासपोर्ट आहे. असे व्यक्ती (एनआरआय़) ऑनलाईन मतदान करु शकतात. अशा आशयाचा संदेश सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. https://www.nvsp.in/ या संकेत स्थळावर ऑनलाईन मतदान करता येणार असल्याचा खोटा संदेश सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

खरंच ऑनलाईन मतदान करता येणार का?

भारतात ऑनलाईन मतदानाची सुविधा नाही. भारतात फक्त पोस्टाद्वारे मतदान करता येते. मात्र, त्या संदर्भात निवडणुक आयोगाला अगोदरच कळवावे लागते. साधारण निवडणुक आयोगामध्ये काम करणारे व्यक्ती आणि निवडणुकी दरम्यान सरकारी कामकाज (Election Duty) असणाऱ्या व्यक्ती पोस्टल मतदानाचा वापर करुन मतदानाचा हक्क बजावत असतात.

Courtesy : Daily Express

निवडणुक आयोगाचे स्पष्टीकरण...

या संदर्भात आम्ही निवडणुक आयोगाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यांनी अशा कोणत्याही प्रकारची सुविधा भारतात नाही. असं स्पष्ट करत सदर संदेश खोटा असल्याचे सांगितले. त्या संदर्भात निवडणुक आयोगाने स्पष्टीकरण देखील दिलं असून निवडणुक आयोगाच्या वेबसाईटवर देखील हा संदेश प्रसारीत करण्यात आला आहे.

निष्कर्ष

निवडणुक आयोगाच्या नावाने सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला ऑनलाईन मतदानाचा संदेश खोटा असल्याचं निष्कर्ष मॅक्स महाराष्ट्र टीम काढत आहे.

Similar News