एकेक श्वास त्यांना मृत्यूच्या जवळ नेतोय

Update: 2019-02-27 15:07 GMT

माहुल गाव म्हटलं की प्रदूषण, आजारं, चकाचक दिसणाऱ्या इमारतीमधलं भयानक वास्तव... गेल्या अनेक वर्षांपासून माहूल गावातील म्हाडा कॉलनीतील लोकांच्या पुर्नवसनाचा प्रश्न प्रलंबित आहे. या मागणीसाठी माहुल गावकरांनी अनेक आंदोलनं केली अजूनही करतायत... नेमकी माहुल गावातील परिस्थिती काय आहे. हे जाणून घेण्यासाठी मॅक्समहाराष्ट्रची टीम पोहचली माहुलच्या म्हाडा कॉलनीत...मीडिया वाल्यांना बघताच भिरभिरणारे ते डोळे, कुठूनतरी आपल्याला जीवनदान मिळेल... आशेचा किरण पुन्हा जागृत होताना त्यांच्या डोळ्यातून पाहायला मिळला.. आजाराने त्रस्त शिवाय हातात पैसा नसणाऱ्या त्या लोकांची कहाणी ऐकताच डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही...

16 केमिकल कंपन्याच्या गराड्यात साडे पाच हजार कुटुंब क्षणोक्षणी मृत्यूशी सामना करत जीवन जगतायत की मरतायत हेच कळायला मार्ग नाही. नागरी सुविधांची तर इथे नेहमीच वाणवा राहिलीय. गळणारे नळ, अस्वच्छता नेहमीचीच आहे. इथे येणारं पाणी पाहिलत तर धक्काच बसेल.. पाण्यावर नेहमी एक चिकट तवंगासारखा थर असतो. इथली लोकं माणसाचं नाही, जनावरापेक्षा वाइट जीवन जगतायत.

 

कॉग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात प्रकल्पग्रस्तांचं माहुल गावात पुनर्वसन करण्याचा निर्णय घेण्यात आला. असा निर्णय घेताना सरकारने किंवा अधिकाऱ्यांनी इथे प्रत्यक्ष येऊन पाहणी केली होती की नाही, माहित नाही.. पण हा निर्णय पूर्णत: चुकीचा निघाला. निर्णय घेणारं सरकार आणि अधिकारी तर निघून गेले, पण इथल्या 250 हून अधिक मृत्यूंची जबाबदारी कोण घेणार..?

कोणत्या कंपन्यांच्या गराड्यात अडकली ही लोकवस्ती?

या परिसरात देशातील तीन सर्वात जुने तसेच मोठे तेल शुद्धीकरण कारखाने, खतनिर्मिती कारखाने, टाटा थर्मल पॉवर टरबाइन युनिट या परिसरात आहेत. अनेक रसायने संग्रहित करण्यात येतात.

त्यापैकी काही रसायने कॅन्सर, टीबी, लकवा सारख्या आजारांना कारणीभूत ठरणारे आहेत. तसेच २००३ मध्ये माहुल दुर्घटना प्रमाण क्षेत्राच्या यादीत समाविष्ट केले असून येथे कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता दाट शक्यता आहे.

माहुल मधून इथल्या लोकांना पुन्हा दुसरीकडे पुनर्वसित करावं या साठी इथले स्थानिक लोक सतत लढा देतायत. राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोनातून ही माहुल संवेदनशील आहे. इथे अशा प्रकारच्या कुठल्याच पुनर्वसन योजना करू नयेत असं आयबी पासून इतर सुरक्षा यंत्रणांचं म्हणणं होतं. मात्र सरकारने कुणाचंच ऐकलं नाही.. अजूनही ऐकत नाही.. तसेच या परिसरा शाळा, रुग्णालयाची सोय नाही...

यावर खासदार राहूल शेवाळे यांच्याशी बातचीत केली असता, लवकरात लवकर आम्ही शाळा रुग्णालयाची सुविधा उपलब्ध करणार आहोत.. सातत्याने मुख्यमंत्र्यांकडे याविषयी पाठपुरावा सुरु असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. पाहा हा व्हिडिओ...

https://youtu.be/dE2PjTtGclQ?t=3

 

 

 

 

 

Similar News