मुख्यमंत्री सोडणार गृहमंत्री पद?

Update: 2018-06-16 06:06 GMT

२०१९ च्या लोकसभा निवडणुकांची तयारी भाजपने आत्ताच सुरु केली आहे. त्यासाठी भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मात्र शिवसेनेकडून युती संदर्भात योग्य प्रतिसाद न मिळाल्याने आता भाजपने वेगळी रणनिती आखल्याचे कळतंय.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरील भार कमी करत त्यांच्याकडील काही खाते इतर मंत्र्यांना देऊन त्यांना पक्षसंघटना मजबुत करण्यासाठी मोकळं करण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्याकडे महत्वाचे असणारे गृह खातं गिरिष महाजनांकडे देण्यात येणार असल्याचे समजते. तसंच माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे पुनर्वसन करण्यात येणार असून त्यांच्याकडे देखील मोठी जबाबदारी देण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

Similar News