दानवेंचा राजीनामा... तर चंद्रकांत पाटलांची प्रदेशाध्यक्षपदी वर्णी

Update: 2019-07-16 11:12 GMT

ग्राहक संरक्षण आणि अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला असून त्यांच्याजागी आता राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. तर आमदार मंगलप्रभात लोढा यांच्याकडे भाजपच्या मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली.

भाजपने अधिकृत पत्रक काढून याबाबतची माहिती दिली.

भाजप खासदार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आज दिल्लीत प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केल्यानंतर काही वेळातच या नव्या नियुक्त्या करण्यात आल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात रावसाहेब दानवे यांच्याकडे राज्यमंत्रिपदाचा भार आहे. त्यामुळे महाराष्ट्र भाजपाच्या प्रदेध्यक्षापदाची जबाबदारी चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोपवण्यात आली. तर आशिष शेलार यांच्याकडून मुंबई अध्यक्षपद काढून त्यांची सूत्र मंगलप्रभात लोढा यांच्याकडे देण्यात आली आहे.

 

 

Similar News