Beed | रस्त्याकडेला फिरून दुष्काळ कळतो का ? केंद्रीय पथकाला शेतकऱ्यांचा सवाल

Update: 2023-12-14 12:30 GMT

ही दृश्ये कुठल्या थंड हवेच्या ठिकाणी केल्या जात असलेल्या फोटो सेशनची नाहीत. दृष्यांमध्ये दिसत असलेला हा ग्रुप कुठल्या पर्यटकांचा मुळीच नाही. बीड जिल्ह्याच्या दुष्काळी पाहणी साठी आलेले हे केंद्रीय पथक आहे. दुष्काळी पाहणी करायची असेल तर शेताच्या मध्यभागी येऊन करायला हवी. रस्त्याच्या कडेला फिरून या पथकाला दुष्काळ समजणार कसा असा संतप्त सवाल बीडच्या शेतकऱ्यांनी केलाय, या पाहणी दौऱ्याला आलेल्या अधिकाऱ्यांना इतक्या घाई घाईत शेतकऱ्यांच्या समस्या कशा समजणार असा सवाल करत शेतकऱ्यांनी आपल्या समस्या माध्यमांसमोर मांडल्या आहेत.

बीड जिल्हा वर्षानुवर्षे दुष्काळाशी झुंज देतोय. जिल्ह्यातील दुष्काळी समस्यांचा अचूक अभ्यास झाल्यावरच यावर मात करण्यासाठी उपाययोजना करता येतील. केंद्रीय पथक इतक्या घाई घाईत दुष्काळ पाहणी दौरा करणार असेल तर जिल्ह्यातील सर्व भागातील वेगवेगळ्या समस्यांचा अंतर्भाव त्यांच्या अहवालात येणार का ? अहवालात अचूकता आली नाही तर त्यावर तयार केलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी होणार तर कशी ? सरकारला अहवालांचा फार्स पूर्ण करत खरंच दुष्काळावर उपाययोजना करायच्या आहेत की केवळ कागदी घोडे नाचवायचे आहेत असा सवाल या दौऱ्याच्या निमित्ताने उपस्थित होत आहे.

Full View


Tags:    

Similar News