भाजपचे मोदी सरकार सर्वच आघाडय़ांवर सपशेल अपयशी ठरले - डॉ. मनमोहन सिंग

Update: 2018-09-08 10:00 GMT

ज्येष्ठ काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांच्या एका पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या समारंभाला अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावली होती. कपिल सिब्बल यांच्या शेडस् ऑफ ट्रुथया पुस्तकाच्या प्रकाशनासाठी हा सोहळा आयोजीत करण्यात आला होता. यावेळी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी आपल्या भाषणातून मोदींवर चांगलीच टिका केली.केंद्रातील भाजपचे मोदी सरकार सर्वच आघाडय़ांवर सपशेल अपयशी ठरले आहे. त्यालापर्यायदेण्याची वेळ आली आहे, “ असे सडसडीत मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

पुढे आपल्या भाषणात ते म्हणाले, “औद्योगिक उत्पादन आणि प्रगती मंदावली आहे. नोटाबंदी आणि जीएसटीच्या चुकीच्या अंमलबजावणीमुळे उद्योगांना फटका बसला आहे. विदेशात दडवलेला काळा पैसा देशात परत आणण्यासाठी मोदी सरकारने काहीही केलेले नाही. मोदी सरकारच्या राजवटीत शेतकरी आणि तरुणवर्ग त्रासून गेला आहे. तर महिला, दलित आणि अल्पसंख्याक समाज हे भयभीत झालेले आहेत. देशातील लाखो तरुण गेली चार वर्षे दोन कोटी नोकर्यांची प्रतीक्षा करीत आहेत.

डॉ. मनमोहन सिंग यांनी सरकारचे परराष्ट्र धोरणही चुकल्यामुळे शेजारच्या राष्ट्रांशी हिंदुस्थानचे संबंध बिघडे आहेत. व एकंदरीत शैक्षणिक स्वातंत्र्यावर बंधने लादली जात असून विद्यापीठांमधील वातावरण नासवले जात आहे, असा आरोप मोदी सरकारवर यावेळी लगावला.

Similar News