भाजपचा ‘विकास’ पागल झाला 

Update: 2019-02-14 10:06 GMT

कृषी परिषदेत अश्लील डान्स

आत्महत्याग्रस्त विदर्भातील शेतकऱ्यांचं दुःख कमी करण्याऐवजी त्यामध्ये दिवसेंदिवस निसर्ग भरच घालतोय. अशा परिस्थितीत सत्ताधाऱ्यांकडून शेतकऱ्यांना अपेक्षा असते. मात्र, सत्ताधारी पक्षाच्या आमदारांच्या कृषी विकास परिषदेतच जेव्हा अश्लील गाण्यावर अश्लील नृत्य केलं जातं, तेव्हा शेतकऱ्यांना किती वेदना होत असतील, याचा विचार सत्ताधाऱ्यांनी केला पाहिजे, अशा संतप्त प्रतिक्रिया आता सोशल मीडियावर उमटू लागल्या आहेत. विकासाचं स्वप्न दाखवणाऱ्या सत्ताधारी भाजपचा ‘विकास’

अमरावती जिल्ह्यातील वरूड इथं भाजपचे आमदार डॉ. अनिल बोंडे यांनी राष्ट्रीय कृषी विकास परिषदेचं आयोजन केलं होतं. ८ ते ११ फेब्रुवारी या चार दिवसात ही परिषद संपन्न झाली. दरम्यान, ९ फेब्रुवारीला लोककला दंडार हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये पुरूष महिलांची वेशभूषा करून नृत्य करत असतात आणि यामध्ये द्विअर्थी संवादाच्या माध्यमातून सामाजिक विषयावर भाष्य केले जाते. असं असलं तरीही दंडार नृत्य सादर करण्याची व्यासपीठं वेगळी आहेत. शिवाय दंडार नृत्य आणि व्हिडिओमध्ये दिसणारं नृत्य यांचा काडीचाही संबंध नाही. दंडार नृत्याच्या नावाखाली अश्लील नृत्य सादर करून दंडार नृत्यालाही बदनाम केल्याची टीका आयोजकांवर होऊ लागलीय. मात्र, असे कार्यक्रम कुठल्या व्यासपीठावर करायचे, याचे भानही आयोजकांनी ठेवलं नाही, अशी टीका आता सुरू झालीय.

https://youtu.be/bUkvi5bUwlw

एका लोकप्रिय मराठी द्विअर्थी गाण्यावर महिलेसोबत नाचणारी व्यक्ती ही निवृत्त नायब तहसीलदार असल्याचं समजतं. विशेष म्हणजे यावेळी काही उत्साही प्रेक्षकांनी नृत्य करणाऱ्यांवर पैसेही उधळले. परिषदेचा विषय हा गंभीर असतांनाही अशा प्रकारच्या अश्लील नृत्यामुळं दुष्काळामुळं आधीच त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या दुःखात भरच पडल्याची चर्चा अमरावतीमध्ये सुरू झालीय.

Similar News