भाजपच्या आयटी सेलच्या निशाण्यावर आदित्य ठाकरे

Update: 2019-10-06 09:44 GMT

होय नाही करत अखेर यंदाच्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपच्या युतीवर शिक्कामोर्तब झालं. जागावाटपाचा नवा फॉर्म्यूला तयार झाला. मात्र, निवडणुकीमध्ये मतांसाठी एकत्र आलेले पक्ष मनाने अजूनही एकत्र आलेले दिसत नाहीत. ‘आरे’ मधल्या मुद्द्यावरून भाजप आणि विशेषतः देवेंद्र फडणवीस यांचं समर्थक असलेल्या ‘पुन्हा नरेंद्र पुन्हा देवेंद्र मिशन २०१९’ या फेसबुक पेजवरून आदित्य ठाकरेंना ट्रोल करण्यात येतंय.

आरे प्रकरणी शिवसेनेनं भाजपच्या विपरित भूमिका घेतली. आदित्य ठाकरे यांनीही ट्विट करत मेट्रोच्या अधिकाऱ्यांवर टीका केली होती. तेव्हापासून या पेजवरून आदित्य ठाकरे यांचे मिम्स बनवून व्हायरल करण्यात येत आहेत. काही पोस्टमध्ये आदित्य यांचा उल्लेख डबल ढोलकी असा करण्यात आलाय.

Full View

‘विकासाला विरोध करणाऱ्यांना जनतेनं मतदान करु नये आणि त्याची जागा दाखवून द्यावी’ असं आवाहनही या पोस्ट्समधून करण्यात येतंय.

Full View

अभिनेत्री दिशा पाटणीसोबत आदित्य यांचा एक फोटो पोस्ट करण्यात आला आहे. ज्यामध्ये आरे वाचवाच्या घोषणा देत आदित्यला दिशा पाटणीला धक्के खात ट्रेनने डेटवर घेऊन जायचंय असं म्हणण्यात आलंय. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये टीका करण्याच्या पद्धतीचं समर्थनही करण्यात आलंय.

Full View

‘मेट्रोच्या कारशेडला शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेने मंजूरी दिली. त्यावर न्यायालयानेही शिक्कामोर्तब केलं. तरीसुद्धा हे विरोध करत आहेत’ अशा आशयाची एक पोस्ट आहे.

मागच्या विधानसभा आणि महापालिकेच्या त्यानंतर झालेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकांमध्ये भाजप आणि शिवसेना वेगवेगळे लढले होते. त्यावेळसही भाजपच्या आयटीसेलकडून ‘खाऊ सेना’ नावाने एक व्हिडीओ सिरीज सुरू करण्यात आली होती.

सातत्याने निवडणुकांच्या तोंडावर भाजपकडून शिवसेनेला आणि विशेषतः आदित्य ठाकरेंना निशाणा बनवण्यात येतं. शिवसेनाही निवडणुकांसाठी आमचे मुद्दे वेगळे असल्याचे दावे करते. मात्र, तरीही हे दोन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढवत आहे.

Full View

Full View

‘पुन्हा नरेंद्र पुन्हा देवेंद्र मिशन २०१९’ हे पेज १५ ऑगस्ट २०१७ ला सुरू करण्यात आलंय. या पेजवरून भाजपच्या आणि विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं समर्थन करण्यात येतं. यासोबत यावरून विरोधकांवरही सातत्याने टीका करण्यात येते. मात्र, आता भाजपच्या टीमने आपल्या मित्रपक्षालाच टार्गेट केलंय.

Similar News