#Ayodhya : वादग्रस्त जमीन प्रकरणाची सुनावणी २६ फेब्रुवारीपासून

Update: 2019-02-20 10:58 GMT

राम मंदिर जमीन वादावर येत्या २६ फेब्रुवारीपासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणीला सुरूवात होणार आहे. पाच न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर या सुनावणीला सुरूवात होणार आहे. ही सुनावणी गेल्या महिन्यातील २९ जानेवारीपासूनच सुरू करण्याचं निश्चित झालं होतं. मात्र, या घटनापीठातील न्या. शरद बोबड हे सुट्टीवर गेले होते. त्यामुळं ही सुनावणी पुढं ढकलण्यात आली होती. आता न्या. बोबडे हे सुट्टीवरून परतले आहेत. त्यामुळं आता येत्या २६ फेब्रुवारीपासून ही सुनावणी सुरू करण्यात येणार आहे. या घटनापीठाचे प्रमुख म्हणून मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई हे काम पाहणार आहेत.

घटनापीठात कोणत्या न्यायाधीशांचा समावेश

सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई हे घटनापीठाचे प्रमुख आहेत. तर न्या. शरद बोबडे, न्या. धनंजय चंद्रचूड, न्या. अशोक भूषण, न्या.एस.नझीर या पाच न्यायाधीशांचा घटनापीठात समावेश आहे.

Similar News