अजित दादांनी डॉ. सुजय विखे यांच्याबाबत केला ‘हा’ गौप्यस्फोट

Update: 2019-03-16 05:06 GMT

पुणे: अहमदनगर दक्षिणमध्ये सुजय विखे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पवार आणि विखे कुटुंबात पुन्हा एकदा संघर्ष निर्माण झाला आहे.

’सुजय विखे यांना राष्ट्रवादीचे तिकीट देऊन निवडून आणण्याची जबाबदारी अजित पवार म्हणून मी स्विकारायला तयार होतो, मात्र, सुजय विखे यांनीच या प्रस्तावाला नकार दिला. सुजयला आता माझ्या समोर आणा, हे जर खोटं असेल तर म्हणाल ते करायची माझी तयारी आहे’ असं म्हणत अजित पवार यांनी डॉ. सुजय विखे पाटील यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसची उमेदवारी नको होती असा दावा केला आहे. त्यामुळे विखेंनी राष्ट्रवादीचे तिकिट का नाकारले असा सवाल पुन्हा एकदा उपस्थित होतो.

मात्र, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवार यांनी बाळासाहेब विखे यांच्या पराभवाबाबत केलेला वक्तव्यामुळे आपण व्यथीत झालो असल्याचं मत पत्रकार परिषदेत व्यक्त केले होते. जर पवारांचा विखे घराण्यावर इतका राग आहे. तर मी अहमदनगर दक्षिणमध्ये आघाडीचा प्रचार करणार नाही. असं देखील विखे यांनी यावेळी सांगितले होते.

दरम्यान अहमदनगर दक्षिणच्या राजकारणामध्ये राज्याला आता पवार विखे संघर्ष पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे.

Similar News