"२०२४ साली पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल?"; भाजपा खासदाराचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्न

भाजप मध्ये राहून भाजपवर सतत टीका करणारे भाजपा खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी केंद्र सरकारला घेरले आहे. सातत्याने केंद्र सरकारची कानउघडणी करणारे सुब्रमण्यम यांनी आता थेट “२०२४ साली पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल?”असा सवाल उपस्थित केला आहे;

Update: 2021-06-28 06:04 GMT

देशाच्या परराष्ट्र धोरणावरुन सुब्रमण्यम स्वामी यांनी मोदींवर कोरडे ओढले आहेत, "चीननं देशात घुसखोरी केल्यानंतर आपल्याला त्यांना सडेतोड उत्तर देणं गरजेचं होतं. गलवान, कैलाश रेंजमध्ये आपण करुन दाखवलं. मात्र पुन्हा एकदा चर्चेकडे वळलो. हे चर्चेचं गुऱ्हाळ मला समजत नाही. आपली जमीन आहे, आपल्या छातीवर बसले आहेत. त्यांच्य़ाशी चर्चा काय करायची. आपल्याला त्यांना धडा शिकवणं गरजेचं आहे. चीनसोबत युद्ध करणं गरजेचं आहे. चीन जगासमोर आपल्याला दाबत असल्याचं दाखवत आहे. त्यात त्यांना यश मिळताना दिसत आहे.", अशा शब्दात सुब्रमण्यम स्वामी यांनी केंद्र सरकारला खडसावलं."

आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नेतृत्वाचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला आहे. ७५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्यांनी कोणत्याही पदावर राहू नये. वयोमानामुळे लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि शांताकुमार यांना भाजपनं बाजूला सारलं आहे. आता २०२४ मध्ये भाजपाचा चेहरा कोण असेल?, याबाबत त्यांनी खुलासा केला पाहीजे.

कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला पाहीजे. कार्यकर्त्यांना विचारलं नाही, तर वाजपेयींसारखी परिस्थिती होईल", असा इशारा सुब्रमण्यम स्वामी यांनी दिला आहे. अदानी च्या शेअर घोटाळ्यावरुन देखील त्यांनी मोदी सरकार लक्ष केला आहे.

"दोन आठवडे झालेत, अदानींच्या कंपन्यांत कुणी पैसे गुंतवलेत अजून कळेना" जम्मू काश्मीरमधील नेत्यांची बैठकीही अमेरिकेच्या दबावात बोलवण्यात आल्याची टीका त्यांनी केली. तसेच करोनास्थितीवरुनही त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली. पहिल्या लाटेनंतर वाढलेल्या अहंकारामुळे दुसऱ्या लाटेत देशाचं नुकसान झालं. आता तिसरी लाट येणार असल्याने लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. "देशात आणीबाणीसारखी स्थिती नाही. आम्ही मुक्तपणे फिरू शकतो. आम्हाला कुणीही तुरुंगात टाकत नाही. त्यावेळेस आम्हाला कोणताच अधिकार नव्हता. मी भाजपामध्ये आहे, मला कोणती गोष्ट आवडली नाही, तर मी टीका करु शकतो. मात्र काँग्रेसमध्ये आजही कुणी असं करु शकत नाही. आजची स्थिती आणीबाणीशी जोडणं चुकीचं ठरेल" असंही त्यांनी स्पष्ट केलं.

राम मंदिराच्या शिलान्यासासाठी आमंत्रित न केल्याने त्यांनी नाराजीही व्यक्त केली. राममंदिर खटला जिंकवण्यात मोलाचा सहभाग होता, असंही त्यांनी आवर्जून सांगितलं.

Full View
Tags:    

Similar News