शिवसेना शिंदे गटाच्या दोन खासदारांना मोदी मंत्रिमंडळात लॉटरी?

Update: 2022-07-19 05:33 GMT

 शिवसेनेच्या आमदारांप्रमाणे शिवसेनेचे १२ खासदार शिंदे गटात सहभागी झाले आहेत. शिवसेनेचे ४० आमदार घेऊन बाहेर पडलेल्या एकनाथ शिंदे यांना भाजप ने राज्यात मुख्यमंत्री केलं. आता केंद्रात १२ खासदार घेऊन भाजप सोबत गेलेल्या एकनाथ शिंदे गटाला केंद्रात मंत्री पद मिळणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिंदे गटाला एक केंद्रीय मंत्री पद आणि दोन राज्यमंत्री पद किंवा दोन कॅबिनेट मंत्री पद (दोन्ही पैकी एक) दिले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

शिवसेनेतून बाहेर पडलेल्या या खासदारांनी लोकसभेतील गटनेते पद राहुल शेवाळे यांच्या कडे देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर शेवाळे यांच्याच गळ्यात केंद्रीय मंत्री पदाची माळ पडण्याची शक्यता आहे.

दिल्लीमध्ये या १२ खासदारांचं मॅनेजमेंट एकनाथ शिंदे यांचा मुलगा खासदार श्रीकांत शिंदे आणि राहुल शेवाळे करत आहे.

यांच्या सोबतीला दिल्लीतील भाजप कार्यालयात बसणारा महाराष्ट्रातील एक बडा नेता देखील असल्याचं समजतंय.

रात्री राजधानी दिल्लीत एकनाथ शिंदे यांनी या खासदारांची सदिच्छा भेट घेत त्यांच्याशी बातचीत केली. या बातचीत दरम्यान शिंदे गटाला काय दिल्लीत काय मिळणार? यावर चर्चा झाली.

Tags:    

Similar News