मुख्यमंत्री शिंदेकडून मोदींचं भरभरुन कौतुक

Update: 2023-08-01 10:42 GMT

आज पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना लोकमान्य टिळक पुरस्काराने गौरविण्यात येणार आले. हा पुरस्कार शरद पवार(Sharad pawar ) यांच्या हस्ते प्रधान करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे जगभरातले लोक महत्वाचा नेता म्हणून पाहतात ही अभिमानाची गोष्ट आहे, असं म्हणत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोदींचं भरभरुन कौतुक केलं.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ज्यांनी समाजामध्ये चांगलं काम केलं त्यांना आजपर्यंत हा पुरस्कार देण्यात आला आहे. शरद पवारांना देखील हा पुरस्कार देण्यात आला आहे. जगात प्रसिद्ध असलेल्या मोदींना हा पुरस्कार देत आहे. त्यामुळे त्यांचे अभिनंदन करतो आणि टिळक स्मारक ट्रस्ट यांचे अभार मानतो.

ते पुढे म्हणाले की "मोदींनी देशाचं सूत्र हाती घेतलं आणि 'सबका साथ आणि सबका विकास'चा नारा दिला आहे. पुरस्कार त्यांच्या कार्याची पोचपावती आहे. जगात मोदींचं नाव आदरानं घेतलं जातं. कोणी ऑटोग्राफर घेतात, फोटो काढतात आणि जेव्हा अमेरिकेचे राष्ट्रपती त्यांना ग्लोबली पॉवरफुल्ल म्हणतात. तेव्हा अभिमानाने छाती फुलते, असं म्हणत त्यांनी मोदींचं कौतुक केलं.

Tags:    

Similar News