लोकांनी उद्धव ठाकरेंना शिवसेनेतून हकलले आहे - गिरीश महाजन

राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी आज पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकेर, संजय राऊत, जितेंद्र आव्हाड, एकनाथ खडसे यांच्यावर विविध मुद्यावरुन तोफ डागली. नेमके ते काय म्हणाले आहेत वाचा आमचा लेख...

Update: 2023-03-04 14:03 GMT

एखाद्या निवडणुकीत निसटता विजय झाला आणि आपण फार मोठा तीर मारला असे समजण्याचे कारण नाही, शिवसेनेची अवस्था काय झाली आहे, असा टोला गिरीश महाजन यांनी ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना लगावला. सर्वांना त्यांची कीव येत असल्याचे सुद्धा महाजन यावेळी म्हणाले. पक्ष राहिला नाही, नाव राहिलं नाही, कार्यालय नाही. समोर आपल्या माईक आहे, आपलं तोंड आहे, आपला भोंगा सुरु करायचं, संजय राऊत महाशय गेल्या दोन दिवसांपासून कशा पद्धतीने शिवराळ भाषा करत आहेत. जनतेला माहित पडलं आहे की, संजय राऊत हे वाचाळवीर आहेत, त्यामुळे ते तोंडात येईल तसे बडबड करतात, त्यांच्याकडे कुणी लक्ष देत नसल्याचे गिरीश महाजन ( Girish Mahajan) यांनी सांगितले.

एकीकडे विधानसभेत अवैधधंद्याबाबत लक्षवेधी मांडायची, मोठ्या मोठ्याने भाषणे करायची आणि दुसरीकडे त्यांच्या मतदारसंघात पोलिसांनी छापा टाकला की, माझे माणसे आहेत, म्हणून पोलिसांना फोन करायचे. पोलिसांना धमकायचे, त्यामुळे खडसे साहेबांचे सर्व पितळ उघड पडतयं, असे म्हणत मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसें यांच्यावर निशाणा साधला आहे. एकनाथ खडसेंची (Eknath Khadse) गौणखनिज घोटाळ्यांची एसआयटीमार्फत चौकशी सुरु आहे, यावर विचारले असता, मंत्री गिरीश महाजन( Girish Mahajan) यांनी खडसे साहेबांच्या अनेक चौकशा सुरु आहेत, नेमकी कोणती चौकशी सुरु आहे, हे माहित नाही.

कापसाला एकीकडे १२ हजार भाव होता, मात्र सध्या जे भाव कापसाला आहेत, ते खते असतील, रासायनिक औषधी असतील, या तुलनेत खऱ्या अर्थाने कमी आहे, असे मंत्री गिरीश महाजन यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कापसाच्या गाठींना भाव कमी झाल्यामुळे हा भाव थोडा तुटलेला आहे, पण निश्चित सरकार याबाबत सकात्मक विचार करतेय, व याच अधिवेशनामध्ये याबाबत निश्चित सकारात्मक निर्णय कापूस उत्पादक शेतकऱ्यांबाबत होईल, असा विश्वासही यावेळी मंत्री गिरीश महाजन ( Girish Mahajan) यांनी व्यक्त केला. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर सर्व किंमतीची भाव वाढ अवलंबून असते त्यामुळेच गॅस सिलेंडर असेल व इतर वस्तूंचे दर वाढल्याचे स्पष्टीकरणही यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी दिले.

अडीच तीन वर्ष लोक अडचणीत होते, लोक मरत होते, तेव्हा घरातून पाय बाहेर काढला नाही, आता त्यांना उशीरा सुचलेले शहाणपण आहे. आता त्यांना लोकांचे प्रश्न दिसत आहेत, महागाई दिसत आहे, असे म्हणत बीड येथे होणाऱ्या उध्दव ठाकरेंच्या सभेवरुन मंत्री गिरीश महाजन यांनी उध्दव ठाकरेंवर ( Uddhav Thackeray) टीका केली. आता लोकांनी उद्धव ठाकरेंना शिवसेनेतून हकलले आहे, असे म्हणण्याची वेळ आली आहे. त्यामुळे यांनी आता कितीही सभा घेतल्या, तरी त्यांचा उपयोग नाही. लोकांनी एकदा यांना संधी दिली होती, या संधीची यांनी माती केल्याचे महाजन यावेळी म्हणाले.

तुम्ही स्वत:ला डॉन समजत होते, लोकांना बेदम मारहाण केली, त्यामुळे डॉन कोण आहे, चोर कोण आहे, हे सुध्दा लोकांना कळालेले आहे, त्यामुळे तुमच्या सर्टीफिकेटची गरज नाही, असे म्हणत मंत्री गिरीश महाजन यांनी जितेंद्र आव्हाड (Jitendra Awad)यांना उत्तर दिले आहे.   

Tags:    

Similar News