Nitesh Rane : बाप बेडवर असताना महाशयांना मुख्यमंत्री बनायचं होतं, नितेश राणे यांचं वक्तव्य

गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीत मोठा भाऊ कोण? यावरून दावे-प्रतिदावे सुरु असतानाच नागपूरमध्ये आदित्य ठाकरे भावी मुख्यमंत्री असे बॅनर लागले होते. त्यावरून भाजप प्रवक्ते नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

Update: 2023-05-23 08:14 GMT

राज्यात राणे विरुध्द ठाकरे (Rane Vs Thackeray) हा वाद नेहमी सुरुच असतो. त्यातच नितेश राणे यांनी नागपूर (Nagpur) येथे आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचे भावी मुख्यमंत्री (Next CM Aditya Thackeray) अशा लागलेल्या बॅनरवरून टीका केली. यावेळी बोलताना नितेश राणे म्हणाले, आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री बनायचे वेध लागलेले आहेत. जेव्हा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जसलोक रुग्णालयात (Jaslok Hospital) उपचार सुरु होते. त्यावेळी आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्री बनण्यासाठीची तयारी करत असल्याची टीका नितेश राणे यांनी केली. (Nitesh Rane criticize to Aaditya Thackeray)

बाप बेडवर असताना मुख्यमंत्री बनण्याची तयारी करणारे आदित्य ठाकरे, असा टोलाही राणे यांनी लगावला. तसेच पुढे बोलताना नितेश राणे म्हणाले, महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) मोठा भाऊ कोण? यावरून वाद सुरु आहेत. त्यामध्ये ठाकरे गट हा मधला भाऊ नाही तर सावत्र भाऊ आहे. हा कुठून तरी उचलून आणलेला भाऊ असल्याचं मत नितेश राणे यांनी व्यक्त केले.

आदित्य ठाकरे यांच्याकडे लोकच राहिले नसल्याने महाविकास आघाडीत ते सरपंच (Sarpanch) तरी होऊ शकतील का? असं म्हणत खोचक टोला लगावला.

Tags:    

Similar News