मी फडणवीसांचा मालक होतो – खडसेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर

Update: 2023-06-27 15:25 GMT

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यात जोरदार वाक् युद्ध सुरू झालंय. या वादाची सुरूवात फडणवीसांनी केल्यानंतर त्याला खडसे यांनी प्रत्युत्तर दिलंय.

जळगाव दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस हे शासन आपल्या दारी या कार्यक्रमात सहभागी झाले होते. शेतकऱ्यांच्या कापसाला तसेच पिकाला भाव मिळत नाही, म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रोहिणी खडसे आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली होती. दरम्यान याच प्रकरणावरून खडसे आणि फडणवीस यांच्यात चांगलीच जुंपलीय.

देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना प्रतिक्रीया देतांना खडसेंवर टीका केली. ते म्हणाले,’’ काळे झेंडे दाखवून त्यांना काय मिळणार आहे. खरं तर खडसेंचं असं झालं आहे. त्यांना आता नवीन मालक मिळाला आहे. त्या मालकानं सांगितलं तसं ते करतात. जमिनीमध्ये तोंड काळं केलं नसतं तर काळे झेंडे दाखवायची वेळ आली नसती. परिवारात राहिले असते, नवीन मालकाकडे जावं लागलं नसतं. अशा काळ्या झेड्यांना घाबरणारे आम्ही नाही. आम्ही जनतेचे लोकं आहोत, जनतेकरीता काम करतो, असा टोला फडणवीसांनी खडसेंना लगावला.

फडणवीसांच्या या टीकेला प्रत्युत्तर देत एकनाथ खडसे म्हणाले की, "देवेंद्र फडणवीस आज खालच्या पातळीवर बोलत असले तरी त्यांचा पक्षात अनेक वर्षे मीच मालक होतो. मी सांगायचो ते फडणवीस करायचे. विरोधी पक्ष नेता होतो. त्यावेळी, मी देवेंद्र फडणवीस यांना सांगायचो कागद आणा तर ते आणून द्यायचे. त्यांना मी ब्रीफ करायला सांगायचो तर ते करायचे. मग मी सर्व जर देवेंद्रजी कडून करून घेतलं तर मी त्यांचा मालक झालो का ? अजित पवार यांच्यासोबत सत्ता स्थापन केली, त्यांच्यासोबत संसार केला मग अजित पवार हे त्यांचे मालक होते का असा खोचक टोलाही खडसेंनी फडणवीसांना लगावला आहे.

Full View


Tags:    

Similar News