Phone Tapping : देवेंद्र फडणवीस यांची साक्ष की चौकशी? गृहमंत्र्यांचे उत्तर

Update: 2022-03-14 13:59 GMT

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची पोलिसांनी रविवारी त्यांच्या घरी जाऊन चौकशी केली. पोलिसांनी आपल्याला एका आरोपीसारखे सवाल केले असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. पण या सर्व प्रकरणात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभेत निवेदन केले. गोपनीय माहिती लीक झाल्याप्रकरणी दाखल गुन्ह्याचा तपास सुरू आहे. त्यात देवेंद्र फडणवीस यांनीही याच डाटाच्या आधारे काही आरोप केले होते, म्हणून पोलिसांनी त्यांची साक्ष नोंदवली आहे, असे स्पष्टीकरण दिलीप वळसे पाटील यांनी दिले. तसेच १६०च्या नोटीशीअंतर्गत तपास अधिकाऱ्यांना कुणाचीही चौकशी करण्याचा अधिकार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

देवेंद्र फडणवीस यांनी आपण विरोधी पक्षनेते आहोत, चौकशी नाकारण्याचा आपल्याला अधिकार आहे पण आपण त्याचा वापर करणार नाही, असे म्हटले होते. यावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी उत्तर दिले. आपण ३५ वर्षे सभागृहाचे सदस्य आहोत, तसेच विधानसभा अध्यक्ष देखील होतो, त्यामुळे सदस्यांचे अधिकार काय आहेत याची आपल्याला माहिती आहे. सभागृहात काही आरोप केले गेले तर त्याबाबत विचारणा करता येत नाही, पण सभागृहाबाहेर आरोप करण्यात आले तर मात्र चौकशी होऊ शकते असेही गृहमंत्र्यांनी यावेळी सागितले. तसेच कोणत्याही राजकीय हेतूने ही चौकशी झालेली नाही फडणवीस यांची केवळ साक्ष नोंदवण्यात आली आहे, त्यामुळे या विषयावर वाड वाढवू नये, असे आवाहनही त्यांनी यावेळी सांगितले.


Full View

Tags:    

Similar News