बाबरी पाडायला गेलो तेव्हा माझं वजन 128 किलो होतं- देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी बीकेसी मैदानावर झालेल्या सभेतून देवेंद्र फडणवीस यांच्या वजनावरून खिल्ली उडवली होती. त्या टीकेला प्रत्युत्तर देतांना माझं वजन 128 किलो होते अशी कबुली देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

Update: 2022-05-16 05:08 GMT

मुंबई महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर भाजप शिवसेना आमने-सामने आले आहेत. त्यातच कोरोनानंतर पहिल्या जाहीर सभेत बोलताना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. त्या टीकेला देवेंद्र फडणवीस यांनी उत्तरसभेतून उत्तर दिले.

यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी वयाच्या 19 व्या वर्षी काश्मीरमध्ये पंडितांवर दहशतवाद्यांकडून हल्ले होत असताना विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून काश्मीरमध्ये गेलो होतो. त्यावेळी काश्मीरमधील नागरिकांना धीर देण्यासाठी आणि आतंकवाद्यांचा सामना करण्यासाठी काश्मीरमध्ये गेलो असल्याचे सांगितले. तसेच बाबरी मशीद पाडण्याबाबत उध्दव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेबाबत देवेंद्र फडणवीस यांनी कबुली दिली.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, 1992 मध्ये मी नगरसेवक बनलो, आणि १९९३ मध्ये मी कारसेवक म्हणून बाबरी पाडण्यासाठी गेलो होतो. आता माझं वजन 102 किलो आहे. मात्र त्यावेळी माझं वजन 128 किलो इतके होते. त्यामुळे तुम्ही माझ्या पाठीत खंजीर खुपसून माझं राजकीय वजन कमी करू शकता. मात्र मी १९९२ साली जसा बाबरीचा ढाचा पाडला तसाच राज्यातील भ्रष्ट महाविकास आघाडीचा ढासा पाडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

आम्ही भ्रष्टाचाराचे पुस्तक छापले आहे. मग जर तुम्ही मुंबई महापालिकेत भ्रष्टाचार केला नाही तर मग तुम्ही किमान काऊंटर पुस्तक तरी छापा, असे आव्हान देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

गदाधारी की गधाधारी

आमचे हिंदूत्व गदाधारी असल्याचे सांगत उध्दव ठाकरे यांनी टीका केली होती. तसेच आम्ही तुम्हाला कधीच सोडले आहे. मात्र आमचे जुने फोटो बघुन त्यांना असे वाटत असेल की आमचे हिंदूत्व गधाधारी आहे. पण आम्ही त्यांना लाथ मारली असे उध्दव ठाकरे म्हणाले होते. त्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, गाढवच लाथ मारतं. त्यामुळे त्यांचे हिंदूत्व गधाधारीच आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली.

Tags:    

Similar News