अमरावतीमधील कोल्हे हत्या प्रकरणात पोलिस कर्मचाऱ्याचा सहभाग – खा. अनिल बोंडे

Update: 2022-07-06 14:20 GMT

नुपूर शर्मा यांची पोस्ट शेअर केल्याप्रकरणी उमेश कोल्हे या व्यवसायिकाची हत्या काही दिवसांपुर्वी झाली होती. त्याप्रकरणी भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी आता पोलिसांवरच आरोप केले आहेत. सदर हत्या प्रकरणात अमरावती पोलिसातील एक कर्मचाऱ्याचा सहभाग असल्याचा आरोप खासदार अनिल बोंडे यांनी केला आहे.

अमरावतीत झालेल्या उमेश कोल्हे यांच्या हत्या प्रकरणात इरफान नावाचा एक आरोपी तसेच रजाक नावाचा एक धर्मगुरू यांचे राजकीय संबंध तपासले पाहिजे. या प्रकरणात अमरावती पोलिसातील एका पोलीस कर्मचाऱ्याचा सहभाग असल्याचा आरोप ही भाजप खासदार अनिल बोंडे यांनी केला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात अमरावती शहरात अवैध धंदे वाढले. या लोकांना संरक्षण मिळाले आणि त्यांचे गट तयार झाले म्हणून अमरावती भयग्रस्त झाली होती असे खासदार अनिल बोंडे म्हणाले.

21 जूनला व्यावसायिक उमेश कोल्हे यांची हत्या झाली. पोलिसांकडे घटनेशी संबंधित सीसीटीव्ही फुटेज होते. मृतकाचा मोबाईल फोन होता. तरी 10 दिवस हे प्रकरण अमरावती पोलिसांकडून दडपणल्याचे आरोप बोंडे यांनी केले. त्यासाठी कोल्हे कुटुंबावर ही दबाव आणण्यात आला. दुसरीकडे एनआयए आल्यावर सहा तासात दोन आरोपी अटक झाली. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर संशय असल्याची भावना बोंडे यांनी व्यक्त केली.

Tags:    

Similar News