मुख्यमंत्री शिंदेंच्या बालेकिल्ल्यात आज आदित्य ठाकरे यांचा दौरा

Update: 2024-02-18 07:23 GMT

राज्याच्या राजकारणात सध्या आगामी लोकसभा निवडणूकीच्या दृष्टीने जोरदार तयारी चालू आहे. राज्यातल्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पक्षांच्या वतीने आगामी लोकसभा निवडणूकांच्या दृष्टीने सर्वच पक्षांनी सुरू केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूरच्या महाअधिवेशनातून उध्दव ठाकरेंवर तोफ डागली असतानाच आज (रविवार, १८ फेब्रुवारी) आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्री शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे दौऱ्यावर येत आहेत. त्यामूळे मुख्यमंत्री शिंदेंच्या टीकेला ते काय उत्तर देतील याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे.

आदित्य ठाकरेंचा असा असेल ठाणे दौरा -

आज सायंकाळी युवा नेते आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्री शिंदेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात आपली हजेरी लावणार आहेत. सायंकाळी ६ च्या नंतर ते ठाण्यातील शाखांना भेट देणार आहेत. त्याचबरोबर पदाधिकाऱ्यांसोबत संवाद देखील करणार आहेत. ठाण्यातील आनंद नगरचेक नागा या ठिकाणी आदित्य ठाकरे यांचे ठाण्याचे खासदार राजन विचारे स्वागत करणार आहेत.

त्यानंतर घोडबंदर रोडवरील आनंदनगर, मनोरमा नगर, पाचपाखाडी येथील शाखांना भेट दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं घर असणाऱ्या लुईसवाडी येथील जिजामाता नगरशाखेला भेट देऊन संवाद साधणार आहेत. 

Tags:    

Similar News