पुणेरी पाट्यांना टक्कर देणारे पुणेरी 'बॅनर'

Update: 2022-02-05 06:48 GMT

पुणे : पुणेरी पाट्या ह्या संपूर्ण राज्यभरात प्रसिद्ध आहेत आणि त्यातील नाविन्यामुळे त्या अधूनमधून चर्चेत देखील येत असतात. पण आता या पुणेरी पाट्यांना टक्कर देणारे पुणेरी बॅनर सध्या चर्चेत आले आहेत. राज्यातील काही महापालिकांच्या निवडणुकांची तयारी राजकीय पक्षांनी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर आता राजकीय टीका, आरोप-प्रत्यारोपही रंगू लागले आहेत. यामध्ये पुणेकरांनी आघाडी घेतली आहे. पुण्यात सध्या महापालिका निवडणुकीची सुरू झाली आहे. सध्या प्रभाग आराखडा प्रसिद्ध झाला आहे. यानंतर इच्छुक उमेदवारांनी आणि काही नगरसेवकांनी आतापासूनच बॅनरबाजीला सुरूवात केली आहे. अनेक नगरसेवकांनी आपण केलेल्या कामांची माहिती बॅनर्समधून दिली आहे.

असाच एक बॅनर सध्या चर्चेत आहे तो म्हणजे शहरातील सानेगुरुजी नगर इथले नगरसेवक धीरज घाटे यांचा.....नागरिकांनी कोणत्याही अडचणीत काही मदत हवी असेल तर त्यांनी काही मोबाईल नंबर दिले आहेत आणि त्यावर मदतीसाठी संपर्क करण्याचे आवाहन केले आहे. पण आता याच बॅनरखाली धीरज घाटे यांच्यावर टीका करणारे बॅनर लावण्यात आले आहेत. भाजपचे नगरसेवक असलेले धीरज घाटे यांनी जिथे गरज तिथे धीरज अशा आशयाचे बॅनर आपल्या प्रभागात लावले आहेत. त्याखाली धीरज आम्हाला नाही तुझी गरज, आता घरी जा परत अशा आशयाचा एक बॅनर त्याच खाली लावण्यात आला आहे. तर नको बापट नको टिळक पुणेकरांना पाहिजे नवीन ओळख अशा आशयाचा दुसरा बॅनरही तिथे लावण्यात आला आहे. पण हे बॅनर कुणी लावले ते कळू शकलेले नाही. सध्या या बॅनरची चर्चा शहरात सुरु आहे. अनेकांनी ह्या बॅनरचा फोटो ट्विटदेखील केला आहे. 

Similar News