टोमॅटो तेजी मंदी ;पटलं तर घ्या :शिवाजी आवटे

कांदा आणि टोमॅटो बाजारभावातील चढ-उतार सोशल मीडियामध्ये वादळ उडवून देतात त्याचा सरकारी धोरणावर परिणाम देखील होतो परंतु प्रत्येक पिकांचे बाजार भाव हे ते पिक किती दिवसांचे आहे यावर जास्त अवलंबून असतात. बहुतेक पिकांच्या बाबतीत ठराविक चक्राकार पद्धतीने बाजार भाव फिरत असतात सांगताहेत कृषी विश्लेषक शिवाजी आवटे...

Update: 2023-09-09 06:09 GMT

 कांदा आणि टोमॅटो बाजारभावातील चढ-उतार सोशल मीडियामध्ये वादळ उडवून देतात त्याचा सरकारी धोरणावर परिणाम देखील होतो परंतु प्रत्येक पिकांचे बाजार भाव हे ते पिक किती दिवसांचे आहे यावर जास्त अवलंबून असतात. बहुतेक पिकांच्या बाबतीत ठराविक चक्राकार पद्धतीने बाजार भाव फिरत असतात सांगताहेत कृषी विश्लेषक शिवाजी आवटे...

टोमॅटो चे भाव वाढले तसं सोशल मीडिया किंवा इतर माध्यमातून तेजी का आली यावर जोरदार विचार मंथन सुरू झाले.आणि 100 रुपये किलो चे भाव दिवाळी पर्यंत 300 रुपये किलो पर्यंत पोहोचतील अशा बातम्या छापून आल्या आणि यूट्यूब वर धडाधड vdo येत गेले की आता टोमॅटो चे भाव 4 महिने खाली येऊ शकतं नाही. सरकार पासून सर्वसामान्य लोकं काळजीनं बेजार झाले.

वस्तुस्थिती काय होती ते पाहू 15 नोव्हेंबर 2022 ला टोमॅटो भाव धाडकन कोसळले होते.टोमॅटो बाबतीत हे नेहमीच घडतं असतं. 15 नोव्हेंबर 2022 ते 15 फेब्रुवारी 2023 तीन महिने टोमॅटो भाव फूकट होते. टोमॅटो उत्पादन खर्च 12 रुपये पकडला आहे. फक्त मार्च महिना टोमॅटो भाव 15/18 रुपये किलो या भावाने विकले गेले.म्हणजेच नोव्हेंबर 2022 च्या लागवडी वगळता बाकीच्या मंदीतील टोमॅटो लागवडी सुद्धा पुन्हा मंदी मध्ये सापडल्या.मंदीत लागवड केली की ते पिक पुढे तेजीत जाते हा नियम साफ चुकीचा ठरला.

आज भाव पडले याचा दोष सगळा शेतकऱ्यांना देऊन राहिले. सगळेच म्हणतात की भाव वाढले म्हणून लागवडीचे प्रमाण वाढले.याची पण शहानिशा करू आज 9 सप्टेंबर आहे खरं तर 25 ऑगस्ट पासून च टोमॅटो भाव खूप कमी होण्यास सुरुवात झाली होती. टोमॅटो च्या बहुतेक व्हरायटी या 70/80 दिवसांत काढणीस येतात आणि त्याचा सर्वात जास्त माल विक्रीसाठी 90 ते 110 दिवसांत तयार होतो.आज पासून 90 दिवस पाठीमागे गेलो तर 10 जून ही तारीख येते आणि टोमॅटो भाव वाढण्यास सुरुवात झालेली ही तारीख आहे . त्या पूर्वी 20 एप्रिल 2023 ते 8 जून 2023 टोमॅटो भाव उत्पादन खर्चाच्या तुलनेत कमी च होते. म्हणजे सध्या च्या टोमॅटो लागवडी ह्या कमीत कमी 20 जून पूर्वी झालेल्या आहेत. आणि त्या पूर्वी रोपांच्या तयारीसाठी कमीत कमी 25 दिवस पकडले तर 25 मे ही तारीख येते.जेव्हा टोमॅटो भाव 2 रुपये किलो होते . म्हणजे त्या रोपांची तयारी ही मंदीतच झाली आहे . इथं पण शेतकऱ्यांनी तेजी पाहून लागवड केली हा मुद्दा कालबाह्य होतो .

प्रत्येक पिकाचे बाजार भाव हे हत्तीच्या चालीने चालत असतात . त्याला कोण काय म्हणतो याच्याशी काही देणंघेणं नसतं. शेतकऱ्यांच्या लागवडीचे नियोजन चुकलं हे आज बोलणं किती चुकीचे आहे हे सांगण्याचा हा प्रयत्न आहे. मार्केट मध्ये ज्यांना काही तरी विकायचं आहे कमीत कमी पिक लागवडीचे नियोजन करताना तरी त्यांच्या पासून थोडं अंतर ठेवलं तर बरं होईल असं मला वाटतं. बाजार भावाचे गणित वाटतं तेवढं सोपं नक्कीच नाही. प्रत्येक पिकांचे भाव दरवर्षी नवीन शिकवण देतात.आपणं जेवढं अपडेट राहू तेवढं जास्त प्रगल्भ होऊ.

प्रत्येक पिकांचे बाजार भाव हे ते पिक किती दिवसांचे आहे यावर जास्त अवलंबून असतात. बहुतेक पिकांच्या बाबतीत ठराविक चक्राकार पद्धतीने बाजार भाव फिरत असतात त्यामुळे आपल्या कडे जेवढे पाठी मागचे बाजार भावाचे अपडेट असतात तेवढं त्या पिकांच्या लागवडीचा कालावधी निवडणं सोपं जातं. सध्या चा भांडवली खर्च पाहता यापुढे शेती मध्ये नवीन प्रयोग करणं सोपं राहीलं नाही.

शिवाजी आवटे 9/9/2023


Tags:    

Similar News