कपाशी पिकाची वाढ खुंटली

Update: 2023-08-24 13:30 GMT

पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा येथील प्रगतशील शेतकरी विश्वास आनंदा पाटील यांच्या शेतातील कपाशी पिकांची वाढ खुंठल्यामुळे शेतातील पिके हि काही छोटेसे तर काही पिके मोठे वाढलेली आहेत.या पिकांची वाढ खुंठल्यामुळे शेतकरीही हैराण झाले आहेत.कपाशी पिकाची वाढ खुंठण्याचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही अशी माहिती शेतकरी विश्वास पाटील यांनी दिली आहे.अनेक महागडी औषधे फवारणी करुन सुध्दा उपयोग झाला नाही.त्यामुळे कपाशी पिकाची वाढ खुंटते कशामुळे हे नेमके कारण समजू शकत नसल्याने शेतकरी वर्गांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तरी कृषी विभागाच्या वरिष्ठ व तज्ञांनी शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन करण्याची मागणी शेतकरी विश्वास पाटील यांनी केली आहे.

पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा येथील प्रगतशील शेतकरी विश्वास पाटील यांच्या शेतातील कपाशी पिकांची वाढ खुंठल्यामुळे पिकाची पाने देखील लाल पडलेली दिसुन येत असल्याने शेतकरी वर्गांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.कपाशी पिकाची वाढ खुंठल्यानंतर लगेच झाडांची पाने देखील लाल पडलेली दिसुन येत असल्याने शेतकरी विश्वास पाटील यांनी सांगितले.


Full View

Tags:    

Similar News