शेतकरी आंदोलन: प्रियंका गांधीं पोलिसांच्या ताब्यात

केंद्र सरकारने लागून केलेल्या तीन नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं गेली २७ दिवस आंदोलन सुरु आहे. काँग्रेसनेही या मुद्द्यावरुन मोदी सरकारला घेरण्याची तयारी सुरु केली आहे.

Update: 2020-12-24 06:50 GMT

भाजपही उद्या देशभर मोदींचं भाषण ऐकवणार आहे. कायदे मागे घेण्याची मागणी करत मोर्चा काढला जाणार होता. मात्र त्याआधीच पोलिसांनी काँग्रेसचा मोर्चा रोखला. यामुळे काँग्रेस नेत्यांनी १० जनपथ येथे रस्त्यावरच ठिय्या आंदोलनास सुरुवात केली. यावेळी प्रियंका गांधीही उपस्थित होत्या. पोलिसांनी कारवाई करत ठिय्या आंदोलन करणाऱ्या प्रियंका गांधींसह इतर काँग्रेस नेत्यांना हटवलं असून ताब्यात घेतलं.

यावेळी प्रियंका गांधी यांनी प्रसारमाध्यांशी बोलताना पोलिसांच्या कारवाईचा निषेध केला आहे. केंद्र सरकार दिशाभूल करु शकत नाही असं त्यांनी म्हटलं आहे. "या सरकारविरोधात असणारे कोणतेही मतभेद दहशतवादाचे घटक असल्याचं सांगितलं जात," असल्याची टीका त्यांनी केली आहे. राष्ट्रपतींची भेट घेण्यासाठी फक्त तीन नेत्यांना परवानगी दिली गेली आहे. अतिरिक्त पोलीस उपायुक्त दीपक यादव यांनी यासंबंधी माहिती दिली आहे. "काँग्रेस नेत्यांना राष्ट्रपती भवनापर्यंत मोर्चा काढण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. तीन नेते राष्ट्रपतींची भेट घेऊ शकतात". दरम्यान राष्ट्रपती भवनापर्यंत मोर्चा काढण्याआधी काँग्रेस मुख्यालयाबाहेर १४४ कलम लागू करण्यात आलं होतं.

नवे कृषी कायदे रद्द करण्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मध्यस्थी करावी यासाठी काँग्रेसने संपूर्ण देशभरात स्वाक्षरी मोहीम राबवली होती. दिल्लीच्या वेशीवर आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी राहुल गांधींच्या नेतृत्वात काँग्रेस खासदारांचं शिष्टमंडळ संसद इमारतीजवळील विजय चौक ते राष्ट्रपती भवनापर्यंत मोर्चा काढणार आहे.

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीदिनी, २५ डिसेंबर रोजी पीएम किसान निधीअंतर्गत ९ कोटी शेतकरी कुटुंबांना १८ हजार कोटी दिले जाणार आहेत. हा निधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. त्यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांशी दूरसंचार माध्यमातून संवाद साधतील. हा कार्यक्रम म्हणजे शेतकरी आंदोलनाला दिलेले प्रत्युत्तर असल्याचे मानले जात आहे. या कार्यक्रमाची गावागावात तयारी करण्याच्या सूचना भाजपने नेते व कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. ठिकठिकाणी मोठे स्क्रीन लावून मोदींचे भाषण शेतकऱ्यांना ऐकवले जाईल. मोदींच्या भाषणाआधी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी जमलेल्या शेतकऱ्यांना शेती कायद्यांची माहिती देणे अपेक्षित आहे. मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी कोणत्या योजना लागू केल्या आहेत याची माहिती देणारे दोन पानी पत्रक तयार केले असून त्याचेही वाटप केले जाणार आहे.

Tags:    

Similar News