शेतकरी आत्महत्या, शेतकरी कर्जमुक्ती सुरु करा: अजित नवले

Update: 2021-01-05 09:50 GMT

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महात्मा फुले कर्जमुक्ती योजना बंद करण्यात आली होती. मात्र, राज्यातील वाढत्या शेतकरी आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी तातडीने सुरू करावी तसंच आधार भावाने शेतीमाल खरेदी करण्यासाठी ठोस पावले टाका. अशी मागणी किसान सभेचे नेते अजित नवले यांनी केली आहे.

2020 मध्ये शेतकरी आत्महत्याचं प्रमाण वाढलं आहे. २०१९ मध्ये अमरावती विभागात १०५६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती. तर २०२० मध्ये 1206 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

२०२० मध्ये शेतकऱ्यांच्या जिल्हानिहाय आत्महत्या-

अमरावती : ३९९

अकोला : १३६

यवतमाळ : ३१९

बुलढाणा : २६०

वाशीम : ९२

कोरोनाच्या काळात आत्महत्या वाढल्या आहेत. त्यातच आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांपैकी २०२० मध्ये ५०% शेतकऱी सरकारी अनुदानास पात्र आहेत. म्हणजे १२०६ पैकी ५११ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाना सरकारी मदत दिली जाणार आहे. तर ४४६ कुटूंब अपात्र ठरणार आहेत. यातील २०७ प्रकरण प्रलंबित आहेत. तर २०१९ मध्ये १०५६ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्या पैकी ५८७ शेतकरी पात्र ठरले आहेत. तर ४५८ शेतकरी अपात्र ठरले आहेत. आत्तापर्यत ११ प्रकरणं प्रलंबित आहेत.

अशी माहिती अजित नवले यांनी मॅक्समहाराष्ट्र शी बोलताना दिली आहे.

Tags:    

Similar News