'Abbajan' politics: योगी सरकार मतांसाठी धार्मिक ध्रुवीकरण करतंय का?

Update: 2021-09-19 07:28 GMT

उत्तरप्रदेश मध्ये विधानसभा निवडणूकांचा बिगूल वाजला आहे. गेल्या चार वर्षात उत्तर प्रदेशचा विकास केला असा दावा करणाऱ्या योगी आदित्यनाथ यांनी आता 'अब्बाजान' चा मुद्दा काढून धार्मिक ध्रुवीकरणाला सुरुवात केली आहे. या संदर्भात ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांनी काही सवाल उपस्थित करत योगी आदित्यनाथ यांच्या धार्मिक राजकारणावर भाष्य केलं आहे.

ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांनी गेल्या 4 वर्षात योगी सरकारने जर विकास केला असेल तर भाजपला 'अब्बाजान' च्या राजकारणाची का गरज पडली? 'अब्बाजान' चं राजकारण म्हणजे धार्मिक ध्रुवीकरण आहे का? योगी आदित्यनाथ मतांसाठी समाजात द्वेष पसरवत आहेत का? योगी यांच्या धार्मिक ध्रुवीकरणावर शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे ब्रेक लागेल का? असे सवाल उपस्थित करत धार्मिक राजकारण देशाला अधोगतीकडे घेऊन जात असल्याचं म्हटलं आहे. पाहा विजय चोरमारे यांचं विश्लेषण...

Full View

Tags:    

Similar News