बलात्कारी, खुन्यांना जन्माला घालणारी व्यवस्था कोण संपवणार ?

ज्यांना लहानपणी आपल्या मुलाने मादर**,भेंच**,आईझ** आणि अश्या असंख्य शिव्या दिल्याचं कौतुक वाटतं.त्यांनी मोठ्यापणी त्याच मुलाने आपल्या घरातल्याबायकांना मारहाण केल्याच पण काही वावग वाटत नाही. बायकांच्या जनेंद्री यांना शाब्दिक इजा करता करता केवळ बलात्कार करून भागत नाही तर योनीमार्गात काठ्या,सळ्या खुपसणे इथपर्यंत हि हिंसा पोहोचते. या हिंसेला जितका आरोपी जबाबदार आहे तितकीच या आरोपीला जन्माला घालणारी व्यवस्था देखील जबाबदार आहे. स्त्रियांचे खून झाल्यावर केवळ हळहळन्यापलीकडे जाऊन हि व्यवस्था बदलण्यासाठी आपण उपाययोजना करणार आहोत का ? वाचा अंतर्मुख करायला लावणारा शाहीर शितल साठे यांचा हा लेख…

Update: 2023-06-24 00:30 GMT

सुरेखा भोतमांगे आणि प्रियांका भोतमांगे या माय लेकींचा जातीय विद्वेशातून हाल हाल करून खून केला. खुनी कुणी एकटा नव्हता तर यामध्ये खैरलांजी गावच सामील होतं. दिल्लीच्या(Delhi) धावत्या बस मध्ये क्रूरपणे मारून टाकलेली निर्भया (Nibhaya), मंदिरात डांबून मारलेली असिफा, जिच्या शरीराचे असंख्य तुकडे करून कुकर मध्ये शिजवून कुत्र्यांना खाऊ घातले ती सरस्वती वैद्य आणि आता लग्नाला नकार दिला म्हणून जीवाला मुकणारी दर्शना पवार (Darshana Pawar). खून करणाऱ्यांची नावे,जाती आणि धर्म वेगळे आहेत. पण या सर्वांच्या गाभ्याशी काय आहे ? या हिंसेच्या मागे नेमकी कोणती मानसिकता काम करते?

असे खुनशी पुरूष कसे जन्माला येतात? स्वतःचा राग बायकांवर काढणारे. हवं तशी मारहाण करणारे पुरुष कसे जन्माला येतात ? या सर्वांची उत्तर केवळ त्या पुरूषांना विचारून कसे चालेल? त्यांच्या या क्रूर वागण्याची त्यांना शिक्षा व्हायलाच पाहिजे. पण हे नराधम घडवणारी व्यवस्था यामध्ये शाबूत राहतेय. त्या व्यवस्थेचं काय करायचं? खून करणाऱ्या व्यक्तींना शिक्षा होईल पण हा बायकांच्या जीवाशी खेळायला शिकवणारा विषमता वादी धर्म आणि संस्कृती कधी प्रश्नांकीत होणार?

या घटना घडल्यावर केवळ हळहळून कसं चालेल? ही हिंसा नसानसात भरलेली आहे. कुटुंबात, अनुसरनात, शिकवणीत,पिढ्या पिढ्यांच्या वारश्यात मिळाली आहे. धर्माच्या नावाने संस्कारात मिळाली आहे. त्यामूळे ज्यांना लहानपणी आपल्या मुलाने मादरचो*,भेंच**,आईझ** आणि अश्या असंख्य शिव्या दिल्याचं कौतुक वाटतं त्यांनी मोठ्यापणी त्याचं मुलाने आपल्या घरातल्याबायकांना मारहाण केल्याच पण काही वावग वाटत नाही. बायकांच्या जनेंद्री यांना शाब्दिक इजा करता करता नुस्त बलात्कार करून भागत नाही तर योनीमार्गात काठ्या,सळ्या खुपसणे इथपर्यंत हि हिंसा पोहोचते. भांडण दोन व्यक्ती मध्ये असू दे, दोन जातींमध्ये असू दे, किंवा दोन धर्मांमध्ये हिंसा त्या समूहातील स्त्रियांना सोडत नाही.

हे समाज व्यवस्थेचं चित्र आहे. पण आता ज्या घटना समोर येत आहेत त्या लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या प्रेम प्रकरण असणाऱ्या नात्यातल्या घटना आहेत.

त्यामुळे अस वाटतय की बायका घरात, समाजात, कामाच्या ठिकाणीच नाही तर स्वतः स्वीकारलेल्या नात्यात पण सुरक्षित नाहीत. म्हणून एकूण नात्यांचा प्रेमाच्या कल्पनांचा मुळातून विचार व्हायला पाहिजे. खासकरून स्त्रियांनी आता मुळातून विचार करायला पाहिजे. आपण ज्याला प्रेम म्हणतोय ते खरंच प्रेम आहे की अवलंबित्व आहे? प्रेमात हिंसा नसते नसायला हवी. असल्या प्रेमाचा त्याग करता यायला हवा. तपासता यायला हवं की आपण ज्या पुरुषाला आपला प्रियकर मानतोय त्याला आपल्याकडून काय हवंय? त्याला तालावर नाचणारी बाहुली हवी आहे का?त्याला स्वतंत्र अस्तित्व असणारी, शिकलेली, पुढारलेली, स्वतःच मत असणारी ,नकार देणारी प्रेयसी परवडते का? इतकं ओळखायला यायला काय अडचण आहे. स्वतःचा सन्मान हरवून. स्वतःच अस्तित्व गहान टाकून कुठलं सुख मिळणार आहे..? खरंतर असा जीव घेण्याचा अधिकार कुणालाच नाही. याचा गंभीर विचार प्रत्येकाने करायला पाहिजे. नुसतं वाईट वाटून चालणार नाही....

- शितल साठे

शाहीर, नवयान महाजलसा

२३ जून २०२३

Tags:    

Similar News