'टूलकीट' म्हणजे काय रे भाऊ?

सध्या देशात टूलकीट चा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून गाजत आहे. भाजप सातत्याने विरोधी पक्षावर टूलकीट तयार करण्याचा आरोप करत आहे. मात्र, हे टूलकीट प्रकरण नक्की काय आहे? तुम्हीही तुमच्या जीवनात टूलकीटचा कधी वापर केला आहे का? जाणून घेऊया Adv. असीम सरोदे यांच्याकडून

Update: 2021-05-29 11:19 GMT

1. दूरदर्शन आता ऑनलाईन शिक्षणाचा दुवा ठरणार. शैक्षणिक उपक्रम, ज्या शाळांना इंटरनेट नाही तेथे ऑनलाईन क्लासेस कसे घायचे.... शिक्षकांनी याचा वापर कसा करायचा? इत्यादी सगळी प्रक्रिया ठरविण्यात येत आहे. ही झाली नवीन शिक्षणाची एक टुलकीट

2. वृक्षारोपणाच्या साक्षरतेसाठी आता 'आयकॉस' या संस्थेने ऑनलाईन गाईड सुरू केली आहे. वृक्षारोपण करण्यापूर्वी मातीच्या गुणवत्तेपासून ते वनस्पतीच्या निवडीचे व रोप कसे लावायचे, कसे वाढवायचे या सगळ्या प्रक्रिया ते सांगणार आहेत. ही झाली पर्यावरणासंदर्भात एक टुलकीट

3. लोकांचा, न्यायालयांचा दबाव आल्याने का असेना व्हेंटिलेटर्स, ऑक्सिजन बद्दल सरकारला बोलावे लागले, डिसेंबरपर्यंत लसीकरण पूर्ण करणार व त्याची प्रक्रिया सांगावी लागली. ही झाली सामाजिक स्वास्थ्याची टुलकीट

4. लॉकडाऊन काही जिल्ह्यात राहणार, काही जिल्ह्यातील हळूहळू शिथिल करणार. कोणत्या गोष्टींना परवानगी असणार, कोणत्या गोष्टींवर बंधने असणार याची माहिती ही झाली सद्यस्थितीत करोनाशी लढण्याची टुलकीट.

क्रिकेटच्या सामान्याच्या आधी विरुद्ध संघातील कमजोरी, ताकद लक्षात घेऊन बॅटिंगचा व बॉलिंगचा क्रम, कुणी कुठे उभे राहून फिल्डिंग करायची हे ठरविले जाते. त्या प्लॅनिंगला सुद्धा टुलकीट म्हणावे लागेल. आपल्या घरी लग्न कार्य असेल तेव्हा कोणाला काय द्यायचे, कसे आदरातिथ्य व स्वागत करायचे, मेनू काय असेल अशा अनेक गोष्टी ठरविल्या जातात तीही टुलकीट असतेच.

रावणाविरुद्ध लढण्याची रामाने केलेली तयारी, ह्युव्हरचना म्हणजे त्यावेळची टुलकीटच होती. अश्या अनेक टुलकीट असतात. त्यामुळे काही अर्धमानव व मंदबुद्धी लोक टुलकीट हा शब्द फारच नकारात्मक पद्धतीने पसरवीत आहेत हे चुकीचे आहे.

एखाद्या खोटरड्या, भारतद्रोही, माणुसघाण्या, यारवादी, हिंसक, भ्रष्टाचारी, पाताळयंत्री, असंवेदनशील, क्रूर, हिटलरवादी, लोकशाही व संविधान विरोधी, पैसा व सत्तेने मस्तवाल झालेल्या बलाढ्य प्रवृत्ती विरुद्ध लढा द्यायचा असेल तर एक नीट नियोजन केलेली "टुलकीट" या भारत राष्ट्राला बलशाली करण्यासाठी आवश्यक आहे.

वरील उद्देशाने कुणी जर लोकशाहीपुर्ण, अहिंसक टुलकीट तयार केली असेल तर ती भविष्यातील उज्ज्वल मातृभू संवर्धनाचा उत्तम मार्ग ठरेल व या भारताला उदात्त मंगलतेकडे घेऊन जाणारे अनेक कुंठित मार्ग त्यातून मोकळे होतील.

जयहिंद ! भारत माता की जय !!


Tags:    

Similar News