जिजाऊ: बारगिरांची प्रेरणा...!!!

आज राजमाता, राष्ट्रमाता जिजामाता यांची जयंती निमित्त महेंद्र लंकेश्वर यांनी अभिवादन. "रैयत" या फारसी शब्दाचा अर्थच आहे. कर देणारे (Tax Payee). जिथे कर भरणारी रयत होती. मध्ययुगीन सरंजामी राज्य (Feudal State) होते.

Update: 2021-01-12 06:29 GMT

बारगिरांनीच गनिमी काव्याचा शोध लावला, पुढे शिवाजी महाराजांचा पुर्वसूरी असलेल्या कर्तबगार मलिक अंबरने हे तंत्र विकसित केले. जिजाऊ व शहाजीराजे यांच्या विवाहाच्या निमित्ताने जो वाद उत्पन्न झाला. तेव्हा जात एकजिनसी राहिली नव्हती. असे कॉ. शरद् पाटलांनी दाखवले आहे. लखोजी जाधवराव हे देशमुख होते तर मालोजीबाबा पाटील...... इथे वर्गीय भेद स्पष्ट होऊन वैमनस्य निर्माण होणे स्वाभाविकच होते. यावर हबशी गुलामातून आलेल्या व आपल्या कर्तबगारीची नोंद इतिहासाला घ्यायला लावणाऱ्या वजीर मलिक अंबरने मध्यस्थी केली. व जिजाऊ, शहाजीराजेंचा विवाह वेरूळात लावून दिला.....!!!

तर एक घोडा दिला, घोड्याच्या पुट्ठ्यावर शिक्का मारला, एक ड्रेस दिला, शस्त्र दिले कि झाला सैनिक....!!!!  म्हणून जिजाऊ बनते बारगिरांची प्रेरणा....!!!

वेतन घेणारे सैनिक...
पोटावर चालणारे...
पोटासाठीच मारणारे आणि मरणारेही....

अशांना आपल्याच आई पांढरीसाठी मरायला आणि मारायलाही आदिम प्रेरणा देणारी मातोसरी.... ही प्रेरणा तिने कशी निर्माण केली??? तर परत भूमिपुत्राची जाण... परत माय निर्ऋती, माय तुळजाई, माय अंबा या आद्यगणमातांनी जसे गणभूमी, व गणधनाचे समन्यायी वाटप आपल्या ज्ञातीत करून दिले.... जेवढा प्रदेश स्वराज्यात जिंकून आला. तो जिजाऊंनी कुणब्यात वाटला. त्याच्या हाती कुळव दिला, बळीनांगर दिला, बी-बियाणे दिले व कुणबायकी करायला लावले.... सन्मानाने जगण्याची साधने आल्याने ते "स्व-तंत्र" झाले.. मध्ययुगातही भौतिक साधनसंपत्तीच्या वाटपाने समता अशी प्रस्थापित झाली....

आद्यगणमाता जगदंबेच्या समतेचा असा प्रभाव जिजाऊवर होता....!!! म्हणूनच रयतेतल्या भूमिपुत्रांना आपली "काळीआय" दिली, आपलीच "आयपांढरी" वसवून दिली....!!! म्हणूनच छत्रपतींच्या स्वराज्यात ते मारायला तयार झाले आणि मरायलाही.... पारधी, कंजारभाटापासून मुसलमानापर्यंत....

सगळ्यांची आई.... डोक्यावर छत्रचामर व हातातला राजदंड न्यायदान करायचा अधिकार प्रदान करतो. तो न्यायदान करण्याचा अधिकार ब्राम्हणी व्यवस्थेने नाकारला होता. हा अधिकार मिळवण्यासाठीच राज्याभिषेक....... आणि राज्याभिषेकाने बनतो अभिषिक्त.  "छत्रपती " छत्रचामर, न्यायदान( Judiciary), महसूली प्रशासन ( Revenue System), चलनव्यवस्था (Monetary System), राजमुद्रा (Royal Stamp) चा अधिनायक.....!!! असे एक नव्हे तर दोन - दोन अधिनायक तयार करणारी मातोसरी.....!!!

छत्रपतींची महसूलीव्यवस्था वाटणारी होती, त्यांचे वारस म्हणवून घेणाऱ्यांची व्यवस्था लाटणारी आहे. सातारा ते अकलूज, वेळापूर पर्यंत अजूनही उतारे निघतात. या फ्लेमेबल विषयावर आज अधिक न बोलता, समता, बंधुता व न्याय या मूल्यत्रयी च्या वारशाची कावड आज निमसरंजामी, भांडवली राज्यातही मातेने खांद्यावर दिली आहे. याची जाण ठेवणे आवश्यक आहे. तरच अभिवादनाला अर्थ असतो....

मातोसरी आऊ साहेबांना कोटी कोटी प्रणाम....

महेंद्र लंकेश्वर
राजरत्ननगर,
माढा...

Tags:    

Similar News