Global Events Impact : आपली परवानगी न घेता, कवेत घेणारा महाकाय भोवरा!

Update: 2025-12-17 01:02 GMT

आपल्याला काय फरक पडतो ? Global Events Impact जगामध्ये घडणाऱ्या घडामोडींबद्दल असा प्रश्न दीर्घकाळात आत्मघातकी सिद्ध होतो. खरेतर खूप फरक पडतो हे सिद्ध झाले आहे. तिकडे अमेरिकेत Artificial Intelligence आर्टिफिशियल इंटीलिजन्स धुमाकूळ घालू लागले आहे; आपण तर इमाने इतबारे नोकरी करतो; आपल्याला काय फरक पडतो ? Rupee रुपया घसरला; आपण तर आयुष्यभर रुपयात सारे व्यवहार करतो, डॉलर काळा का गोरा हे देखील कधी बघितले नाही; आपल्यला काय फरक पडतो ? अमेरिका भारत (आणि इतर राष्ट्रांबरोबर देखील ) Trade व्यापार करार होणार आहे म्हणे; आपण तर प्रगतीशील Farmer शेतकरी आहोत. आपल्याला काय फरक पडतो ?

असे बोलणारे अनेक जण असतात; पण वरकरणी, आपल्याशी डायरेक्ट संबंधित नसणाऱ्या, Global जागतिक स्तरावर आणि देशाच्या Political Economy राजकीय अर्थव्यवस्थेत घडणाऱ्या अनेक मोठया घडामोड, आज ना उद्या आपल्या मानगुटीला पकडतातच ! गेल्या काही दशकांच्या Financial History आर्थिक इतिहासावर नजर जरी टाकली तरी हे लक्षात येईल. ऐंशीच्या दशकात शिकागो स्कुलचे अर्थतज्ञ, जागतिक बँक, नाणेनिधी… बाजाराधिष्टित आर्थिक तत्वज्ञानावर चर्चा करत होते. आपल्याला माहीतही नव्हते, त्यानंतर पृथ्वीवरील जवळपास प्रत्येक देशात त्या नवउदारमतवादी आर्थिक तत्वज्ञानांवर आधारित अर्थव्यवस्थांचे पुनर्संघटन केले गेले.

ऐंशीच्याच दशकात पर्सनल कॉम्प्युटर्स आले. सरकारने काही फतवा नव्हता काढला कि कॉम्प्युटर नाही घेतला किंवा वापरला तर तुरुंगात टाकू, पण ४० वर्षानंतर अगदी ग्रामीण भागातील ज्यांना चालवता येत नाही त्यांना देखील आपल्या पाल्यांना कॉम्प्युटर आला पाहिजे हे कळले.

नव्वदीच्या दशकात जागतिक बँक मायक्रो फायनान्स वर मांडणी करत होते. १०० कोटींचा फंड तयार केला गेला. मोहंमद युनूस ना नोबेल प्राईज दिले गेले. आपल्याला माहित नव्हते. आज भारतातील नाही जगातील ५०० कोटी बॉटम ऑफ पिरॅमिड लोकसंख्या या भोवऱ्यात ओढली गेली आहे. याच सर्व काळात इंटरनेट, स्मार्टफोन, इंटरनेट बँकिंग, क्रिप्टो, युपीआय, सर्वच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स फेसबुक, व्हाट्सअप, इन्स्टा, ट्विटर, ऑनलाईन डेटिंग, पॉर्न्स, सॅटेलाईट्स, ओटीटी प्लॅटफॉर्म्स, ऑनलाईन रिटेल, वर्कर्सची नवीन कॅटॅगिरी : गिग वर्कर्स, शेकडो अँड्रॉइड बेस्ड ऍप्स … … … तुम्हीच काढा यादी Facebook, WhatsApp, Instagram, Twitter, online dating, pornography, satellites, OTT platforms, online retail, a new category of workers: gig workers, hundreds of Android-based apps

आपल्या २४ तासाच्या आयुष्याला स्पर्श करणाऱ्या नाही तर अविभाज्य भाग झालेल्या यातील जवळपास सर्व गोष्टी हजारो किलोमीटर दूर, संख्येने अतिशय मूठभर असणाऱ्या व्यक्तींनी तयार केल्या / ठरवल्या / विकसित केल्या आहेत, आज देखील जात आहेत, नजीकच्या भविष्यात केल्या जातील. आपल्याला पहिल्यांदा वाटते हे सारे त्यांच्यासाठी म्हणजे प्रस्थापित, उच्च वर्गासाठी आहे, पण काही दिवसांनी कळते तो मोठा मोठा होत जाणारा आपल्याला, आपली परवानगी न घेता, कवेत घेणारा महाकाय भोवरा आपल्याला आतपर्यंत ओढून घेतो.

हे चांगले का वाईट, हे शोषक का मुक्तिदायी, हे चंगळवादी का आरोग्यदायी, हे नफेखोर कि चॅरिटेबल याबाबत जजमेंटल न होता याची किमान माहिती घेतली पाहिजे ; त्या क्षेत्रातील तंत्रज्ञ, विशेषज्ञ व्यक्तींना पाचारण करून समजवून घेतले पाहिजे. ऑथेटिंक माहिती, आकडेवारी, संकल्पना महत्वाच्या असतात. मूल्यधारित, नैतिक जजमेंट त्याला पर्याय नाही. ते जजमेंट पास केले कि आपल्या मनाची, मेंदूची सारी कवाडे बंद होतात; मग आपण तेच बघतो, तेच ऐकतो, तेच वाचतो, त्यांचेच ऐकतो जे आयडियॉलॉजिकली आपल्याला जवळचे आहे, त्याने आपलेच नुकसान होते.

संजीव चांदोरकर

अर्थतज्ज्ञ

Similar News