मोदी - शब्दांचा बुडबुडा! - डॉ. विनय काटे

पंतप्रधान मोदी जेव्हा जेव्हा देशाला संबोधित करतात तेव्हा त्याच्या भाषणात काही खोटी तत्थ्य सापडतात. त्यांनी जे नोटबंदी, लॉकडाऊन, हर घर तिरंगा या सारखे मोठे निर्णय घेतले त्याचे नंतर आपल्याला विपरीत परिणाम झालेले पहायला मिळाले आहेत. तरीही मोदींचा जनाधार फार मोठा आहे असं का? जाणून घेण्यासाठी वाचा डॉ. विनय काटे यांचा लेख!

Update: 2022-08-16 07:55 GMT

गेल्या ८ वर्षांपासून प्रत्येत स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान मोदी हे स्वातंत्र्य दिनी देशाला संबोधित करत आहेत. त्यांच्या प्रत्येक भाषणात ते जनतेला त्यांच्या मोहात पाडतात. पण त्यांच्या भाषणातील घोषणांमध्ये फारसं तत्थ्य नसतं हे वारंवार दिसून आलं आहे. हे असं का आहे हे जाणून घेऊयात डॉ. विनय काटे यांच्या या लेखात.

मोदी जे काल लाल किल्ल्यावरून बोलले किंवा गेली 10 वर्ष सतत बोलत आहेत त्याला आम्ही IIM मध्ये "globe मारणे" किंवा "gas" म्हणायचो.

फक्त मोठाले प्लॅन सांगायचे... तेसुद्धा generic! म्हणजे त्यात कुठले quantification आणि timeline नसावे. उदाहरणार्थ "आपला देश विश्वगुरू बनवायचा आहे!", "विकसित भारत बनवायचा आहे!" म्हणजे नेमके काय, कधी, कसे करायचे आहे ते मात्र सांगायचे नाही.

गेल्या 10 वर्षातली मोदींची भाषणे ऐकुन कुणीही सांगावे की शिक्षण, आरोग्य, रोजगार, महागाई, गुन्हेगारी, रस्ते, वीज, पाणी, दरडोई उत्पन्न, वित्तीय तूट, GDP वगैरे बाबतीत 2014 पर्यंतची स्थिती त्यांनी कधी आकड्यांमध्ये सांगितली? किंवा तिथून पुढे दरवर्षी त्याच गोष्टींमध्ये त्यांच्या धोरणांनी कोणता संख्यात्मक बदल आणला आहे हे तरी त्यांनी कधी सांगितले? मुदलात त्याबाबत त्यांची धोरणे तरी आहेत का काही हे तरी कधी सांगितले?

भाजपचे लोक UPA-2 च्या काळात सरकारचा विरोध करताना "Policy Paralysis" हा शब्द वापरायचे. गेल्या 8 वर्षात मोदींच्या काळात Policy हा शब्दच हद्दपार झाला आहे. सरकारचे निर्णय आता फेफरे आल्यासारखे असतात, ज्यामध्ये कुठलाही विचार, व्हिजन किंवा प्लॅन नसतो. कसलाही विचार न करता आणलेली नोटबंदी, अचानक आणलेले लॉकडाऊन, कॉर्पोरेट टॅक्स विनाकारण कमी करणे, पूर्वतयारी नसताना "घरोघरी तिरंगा" लावायला सांगणे आणि मग सदोष ध्वज लोकांना वाटून आपल्या ध्वजाचा अपमान आपणच करणे ... हे मोदींच्या सरकारचे निर्णय हे कुठल्याही policy मध्ये बसत नाहीत.

सध्या आपल्या देशाचा कारभार एका अशा माणसाच्या हाती आपण दिला आहे ज्याला कसलीही vision नाही, ज्याचा कशाचा अभ्यास नाही आणि ज्याला कुणाचे ऐकायची सवय नाही... फक्त मोठे मोठे आणि निरर्थक बडबडण्याची सवय आहे, इव्हेंट करायची हौस आहे आणि आपण कसे सतत चर्चेत-बातम्यांमध्ये राहू याचा अट्टाहास आहे.

मोदी हा शब्दांचा बुडबुडा आहे ज्याने भारतातील बहुतांश मूर्ख (ज्यात उच्चशिक्षित जास्त आहेत) जनतेला अशी काही स्वप्ने दाखवली की त्यातून ते बाहेर यायची शक्यता जवळपास नाहीये. हा देश आता "मूर्खांचे नंदनवन" बनलेला आहे यात संशय नाही!

- डॉ. विनय काटे

Tags:    

Similar News