...तर भारत-चीन दहा वर्ष मागे जाईल

भारत-चीन सीमेवरील सीमा वादात सरकारने चीन ने सैन्य परत घेतल्याचा दावा केला आहे. भारत चीन सिमेवर सर्व काही चांगलं चाललं असल्याचा बोललं जात असलं तरी आपण पुन्हा एकदा ‘हिंदी-चीनी भाई-भाई’ असं म्हणू शकतो का? पाहा भारत-चीन संबंधावर ब्रिगेडिअर सुधीर सावंत यांनी केलेले विश्लेषण

Update: 2021-02-13 14:53 GMT

सध्या देशभरात भारत-चीन कराराची जोरदार चर्चा सुरु आहे. भारत-चीन सीमेवर एप्रिल महिन्यापासून सुरु झालेला तणाव सध्या निवळत असल्याचा दावा सरकारने केला आहे. गुरुवारी केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत चीन आणि भारताच्या सीमेवर असलेल्या तणावाबद्दल झालेल्या कराराबदद्ल माहिती दिली.

यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारने देशाची जमीन चीन ला दिल्याचा दावा केला आहे. यासंदर्भात ब्रिगेडिअर सुधीर सावंत यांच्याशी मॅक्समहाराष्ट्रने चर्चा केली. यावेळी त्यांनी भारत चीन संबंध सध्याच्या परिस्थितीत पुन्हा एकदा हिंदी-चीनी भाई-भाई' असं म्हणता येईल अशा स्थितीत येऊन पोहोचले आहेत का ? असा सवाल केला आहे. तसंच चीन-भारतात जर युद्ध झालं तर दोन्ही देश १० वर्षे मागे जातील असं त्यांनी म्हटलं आहे. पाहा हा व्हिडिओ...

Full View


Tags:    

Similar News