हिंदू-मुस्लिम वादासाठी आधी औरंगजेब आणि आता अफजलखान ठरतोय कारण

राज्यात विविध ठिकाणी औरंगजेबाचे फोटो स्टेटसला ठेवल्याने हिंदू-मुस्लिम वाद सुरु झाला. पण हा वाद का उकरला जातोय? जाणून घेण्यासाठी पहा....

Update: 2023-07-10 08:16 GMT

गेल्या काही वर्षांपुर्वी सत्ता मिळवण्यासाठी काही लोकांकडून हिंदू मुस्लिम वाद पेटवला होता. त्यावेळी अफजलखानाच्या कबरीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. त्यानंतर सांगली जिल्ह्यात दंगली उसळल्या होत्या. मात्र त्यानंतर काही लोकांनी सत्य सांगायला सुरुवात केली. ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनीच अफजलखानाच्या वधानंतर त्याची समाधी बांधल्याचे इतिहास अभ्यासकांनी समोर आणले. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज विरुध्द अफजलखान वाद हा कोणत्याही धर्मासाठी नव्हता. हा वाद हिंदू-मुस्लिम असा नव्हता. तर सत्तेसाठी होता, हे शिवाजी महाराज यांनी अफजलखानाच्या बांधलेल्या कबरीमुळे समजले.

याबरोबरच छत्रपती शिवाजी महाराज यांनी पहिली लढाई ही जावळीच्या चंद्रराव मोरे यांच्याशी केली होती. तसेच औरंगजेब स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांविरोधात चालून आला नव्हता तर त्याने मिर्झा राजे जयसिंग या हिंदू राजाला छत्रपती शिवाजी महाराजांवर चालून पाठवले होते. त्यामुळे या छत्रपती शिवाजी महाराज यांची लढाई धर्मासाठी नव्हती, असं मत ज्येष्ठ इतिहास अभ्यासक राम पुनियानी यांनी व्यक्त केले.

Full View

Tags:    

Similar News