दारूविक्री तर लांबच गडचिरोलीतील या गावात खर्रा पन्नी देखील सापडणार नाही

दारूविक्री तर लांबच गडचिरोलीतील या गावात खर्रा पन्नी देखील सापडणार नाही

Update: 2023-05-14 02:45 GMT

दारूमुळे गावात भांडण तंट्याचे प्रमाण वाढले होते. महिलांना मारहाण आर नित्याचीच. या सर्व प्रकाराला आळा घालण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात असणाऱ्या पुसेर या गावातील ग्रामस्थांनी २०१४ या वर्षी ग्रामसभा घेतली. या ग्रामसभेत दारू, खर्रा तसेच तंबाखू बंदिचा सामुहिक ठराव केला. हे गाव केवळ ठराव करून थांबले नाही तर त्याची अंमलबजावणीदेखील केली. गावातील पानठेले बंद झाले. खर्रा तंबाखू विक्री करणाऱ्यास ५ हजाराचा दंड आकारण्यात आला. गावात कुणी खर्र्याचा कागद जरी टाकला तरी त्याला दंड आकारला जातो. या निर्णयानंतर गाव दारू व तंबाखूमुक्त झाले आहे.

गावकऱ्यांनी व्यसनावर मिळवलेल्या विजयाचे प्रतिक म्हणून गावात मुक्तीपथ अभियानाच्या माध्यमातून विजयस्तंभ उभारण्यात आला आहे. दारूविक्रीबंदिसाठी प्रशासकीय व्यवस्था हतबल ठरत असताना गावातील नागरिकांनी निर्णय घेऊन त्याची प्रभावी अंमलबजावणी केली आहे. गावातील हा उपक्रम महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी आहे.

Tags:    

Similar News