संपूर्ण जगात कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या १८ लाखांच्यावर पोहोचली आहे. तर मृतांची संख्या सुमारे साडे पाच हजारांनी वाढून आता १ लाख १७ हजारांच्या पुढे गेली आहे. जगातील एकूण रुग्णांपैकी ५० टक्के रुग्ण हे युरोपमध्ये आहेत, इथली संख्या सध्या ९ लाख ४३ हजार २७२वर पोहोचली आहे.
जगातील सर्वाधिक रुग्णसंख्या असलेला देश ठरला आहे अमेरिका. अमेरिकेत सध्या कोरोनाचे ६ लाख ४४ हजार ९८६ रुग्ण आहेत. गेल्या २४ तासात जगभरात सुमारे ७७ हजार नवीन रुग्णांची भर पडली आहे. चीनमध्ये कोरोनावर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवण्यात आले असून गेल्या २४ तासात इथे फक्त ९९ नवीन रुग्ण आढळल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेनं दिली आहे. दरम्यान पाकिस्तानात कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या ६ हजारांच्यावर गेली आहे तर मृतांची संख्या १००च्या जवळपास आहे.